मराठी मावळ्यांचा ‘न्यूयॉर्क ’मध्ये जागर
By Admin | Updated: January 13, 2016 23:49 IST2016-01-13T23:43:56+5:302016-01-13T23:49:59+5:30
संगमनेर : महाराष्ट्रातील तरुण मराठी मावळ्यांनी न्यूयॉर्क (अमेरिका) मध्ये स्थापन केलेल्या छत्रपती फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला.

मराठी मावळ्यांचा ‘न्यूयॉर्क ’मध्ये जागर
संगमनेर : महाराष्ट्रातील तरुण मराठी मावळ्यांनी न्यूयॉर्क (अमेरिका) मध्ये स्थापन केलेल्या छत्रपती फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला.
जिजाऊ जन्मोत्सव अनेक देशांत या वर्षी पहिल्यांदा साजरा होत आहे. यावर्षी न्यूयॉर्क (अमेरिका) येथे महाराष्ट्रातील तरुणांनी एकत्र येवून स्थापन केलेल्या छत्रपती फाउंडेशनच्या माध्यमातून जगातील अमेरिका, कॅनडा, आस्ट्रेलिया, यूक्रेन, इंग्लंड, ब्राझील, रशिया, चीन, फ्रान्स, जर्मनी, सिंगापूर, दुबई आदी सर्व ठिकाणी जिजाऊ जन्मोत्सव एकाच वेळी साजरा करण्यात आला. सिंदखेड राजा येथील जिजाऊं च्या जन्मोत्सवासह देश-विदेशातील मावळ्यांनी त्यांच्या स्मृती जागवत प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. गुजरात, पंजाब, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, हरियाणा, राजस्थान आदी राज्यातील तरुण-तरुणींनीही सहभाग घेतला. जगभरात व्यवसाय, नोकरी व शिक्षणाच्या निमित्ताने गेलेल्या भारतीय तरुणांना संघठीत करून फाऊंडेशनच्या माध्यमातून मदत देण्याचा निर्णय सर्वांनी घेतला.
फाउंडेशनचे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय संपर्कप्रमुख विनोद झेंडे, उपाध्यक्ष महेंद्र सिनारे, न्यूयॉर्क प्रांताचे अध्यक्ष प्रशांत भुसारी, न्यूयॉर्क मीडिया संपर्कप्रमुख मुजम्मील मुकादम, न्यू जर्सी प्रांताचे अध्यक्ष वंदन पटेल, कनेक्टीकेट प्रांताचे अध्यक्ष वेदांत रेड्डी, टेक्सास प्रांताचे अध्यक्ष महेंद्र बंगेरा, कॅलिफोर्निया प्रांताचे अध्यक्ष रतनपाल कांबळे, युवती अध्यक्षा माधुरी झिंजुर्डे, उपाध्यक्षा नवप्रीत कौर, मेघाली पवार, अंकिता रेड्डी, स्नेहा घोलप, विभुती पारेख, अल्पिता पटेल, किंजल पटेल, केयुर पटेल, शैलेश गौतम, राज पटेल, श्रीराम रेड्डी, आदेश पवार, वैभव मूले, वैभव बांगर, सतीश बोंबले, अभिजीत जाचक, प्रिया माने, ऐंजेलीनो वेगीस, जॉन, सचिन सिंग, पीटर, विशाल सस्ते आदी सहभागी झाले होते.
(प्रतिनिधी)