निंभारीच्या शालेय समितीच्या अध्यक्षपदी जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:25 IST2021-09-04T04:25:33+5:302021-09-04T04:25:33+5:30

पाचेगाव : नेवासा तालुक्यातील निंभारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विठ्ठल जाधव तर उपाध्यक्षपदी कविता ...

Jadhav as the chairman of Nimbhari's school committee | निंभारीच्या शालेय समितीच्या अध्यक्षपदी जाधव

निंभारीच्या शालेय समितीच्या अध्यक्षपदी जाधव

पाचेगाव : नेवासा तालुक्यातील निंभारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विठ्ठल जाधव तर उपाध्यक्षपदी कविता जाधव यांची निवड करण्यात आली.

मंगळवारी मराठी शाळेच्या कार्यालयात निवड प्रक्रियेची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी निंभारीच्या सरपंच भागीरथी पवार ह्या होत्या.

नवीन शालेय व्यवस्थापन समितीमध्ये सारिका जाधव, मंजाबापू बर्डे, आण्णासाहेब शेजुळ, कीर्ती जाधव, स्वाती जाधव, संध्या जाधव, पल्लवी पवार, श्रेया पवार, सार्थक जाधव, कैलास साळुंके, सुनील दरंदले यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

यावेळी सरपंच भागीरथी पवार, शाळेचे मुख्याध्यापक सुनील दरंदले, प्रगत सोसायटीचे संस्थापक बाबासाहेब पवार, कामगार पोलीस पाटील संतोष पवार, चंद्रकांत पवार, यमाजी जाधव, प्रगत सोसायटीचे अध्यक्ष आप्पासाहेब जाधव, दादापाटील जाधव, सूर्यकांत जाधव, कल्याण जाधव, सीताराम जाधव, विशाल जाधव, जनार्दन पवार, जनार्धन गवळी आदी उपस्थित होते.

Web Title: Jadhav as the chairman of Nimbhari's school committee