पिकांची नुकसान भरपाई देणे शक्य होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:21 IST2021-08-01T04:21:07+5:302021-08-01T04:21:07+5:30
१५ ऑगस्टपासून महसूल विभागाचा ई पीक पाहणी प्रकल्प राज्यभर सुरू होणार आहे. शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धती आहे. ...

पिकांची नुकसान भरपाई देणे शक्य होणार
१५ ऑगस्टपासून महसूल विभागाचा ई पीक पाहणी प्रकल्प राज्यभर सुरू होणार आहे. शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारित शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जाते. मात्र, दोन तीन गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही. यासाठी महसूल विभागाने आपल्या पिकाची रिअल टाईम नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. टाटा ट्रस्टच्या साहाय्याने या अप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. या मोबाईल अप्लिकेशन मध्ये शेतकरी पिकांची माहिती भरतील, तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील. यामुळे पीक पेरणीची रियल टाईम माहिती अप्लिकेशन मध्ये संकलित होणार आहे. माहिती संकलित होताना पारदर्शकता येणार आहे. पीक पाहणी नोंदणीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवल्यामुळे पीक विमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल.