‘तो’ बॉम्ब निकामी करण्यासाठी हालचाली
By Admin | Updated: May 26, 2014 00:26 IST2014-05-26T00:11:47+5:302014-05-26T00:26:11+5:30
श्रीगोंदा : कुकडी साखर कारखान्यानजीक जमिनीत सापडलेला ब्रिटीशकालीन बॉम्ब निकामी करण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी लष्करी दलाला पत्र दिले आहे.
‘तो’ बॉम्ब निकामी करण्यासाठी हालचाली
श्रीगोंदा : कुकडी साखर कारखान्यानजीक जमिनीत सापडलेला ब्रिटीशकालीन बॉम्ब निकामी करण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी लष्करी दलाला पत्र दिले आहे. त्यानुसार हा बॉम्ब रविवारी रात्री किंवा सोमवारी निकामी करण्यात येण्याची शक्यता आहे. प्रशांत वाबळे यांच्या मालकीच्या जागेत हा बॉम्ब सापडला होता. बॉम्ब असलेल्या परिसरात पोलीस पहारा ठेवण्यात आला असून बॉम्ब ठेवलेल्या परिसरात जाण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. बॉम्ब निकामी करणार्या नगर येथील पोलीस पथकाने शनिवारी रात्री घटनास्थळास भेट दिली. परंतु बॉम्ब निकामी करण्यात आला नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी बॉम्ब निकामी करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना पत्र दिले. त्यानुसार जिल्हाधिकार्यांनी पुढील पावले उचलली आहेत. (तालुका प्रतिनिधी)