व्यापाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरणे अशोभनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:31 IST2021-02-05T06:31:58+5:302021-02-05T06:31:58+5:30

कोपरगाव : नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यानी नुकतीच शहरातील प्लास्टीक पिशव्या वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली. कारवाईनंतर दंडाच्या पावत्या फेकत, अरेरावीची भाषा ...

It is indecent for traders to use the language of Areravi | व्यापाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरणे अशोभनीय

व्यापाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरणे अशोभनीय

कोपरगाव : नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यानी नुकतीच शहरातील प्लास्टीक पिशव्या वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली. कारवाईनंतर दंडाच्या पावत्या फेकत, अरेरावीची भाषा करत निघून गेले. व्यापाऱ्यांनी नम्रतापूर्वक व सभ्यपणे त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु हे कर्मचारी ऐकायच्या मन:स्थितीत नव्हते. महाराष्ट्र शासनाने प्लास्टीकबंदी केली, याचे आम्ही सर्व व्यापारी समर्थन करतो.

मात्र, व्यापारी ५० मायक्रोनच्या पुढे पिशव्या वापरात असतानाही, त्यांचेवर अरेरावीची व दमदाटी केल्याचा कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने निषेध नोंदवित असल्याचे कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे यांनी म्हटले आहे.

कोयटे म्हणाले, व्यापारी ५० मायक्रोनच्या पुढील पिशव्या वापरतील, परंतु भाजीपाला, फळे विक्रेते, चहा विक्रेते अशा किरकोळ विक्रेत्यांना ५० मायक्रोच्या पिशव्या वापरणे परवडणारे नाही. या बाबतीत शासनानेही पर्याय उपलब्ध करून द्यावा. नगरपरिषदेनेही हा पर्याय उपलब्ध करण्यास पुढाकार घेतल्यास कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ यात सर्वोतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे. शहरात व्यापारी महासंघ वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, शहरातला पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तलावातील गाळ काढणे, कोरोनाचे काळात अन्नदान योजना राबविणे यांसारख्या अनेक सामाजिक योजनांत नेहमीच पुढाकार घेत असतो. शहरात खराब रस्ते, प्रचंड धुळीचा त्रास सहन करत, व्यापारी वर्ग आपले दुकान चालवत आहे. अर्थात, आम्ही कायद्याचे पालन करणार आहोत. कोरोनाकाळात प्रचंड मेटाकुटीला आलेला व्यापारी वर्ग आता कुठे पुन्हा स्थिर स्थावर होत असताना होत असलेली धडक कारवाई ही व्यापाऱ्यांना जाचक होत आहे. व्यापारी वर्गानेही ५० मायक्रोपेक्षा खाली कॅरी बॅगा वापरू नये, असेही आवाहन व्यापारी महासंघाचे वतीने करण्यात येत असल्याचे कोयटे यांनी म्हटले आहे.

Web Title: It is indecent for traders to use the language of Areravi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.