प्रजासत्ताक दिनी राजपथावर संचलनाची संधी हा मोठा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:22 IST2021-09-18T04:22:23+5:302021-09-18T04:22:23+5:30
संगमनेर : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत राजपथावर संचलन करण्याची संधी मिळणे हा जीवनातील मोठा गौरव आहे. या संचलन संघाचे नेतृत्व ...

प्रजासत्ताक दिनी राजपथावर संचलनाची संधी हा मोठा गौरव
संगमनेर : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत राजपथावर संचलन करण्याची संधी मिळणे हा जीवनातील मोठा गौरव आहे. या संचलन संघाचे नेतृत्व करण्याचा बहुमान मिळाला तर हा विद्यार्थ्यांचा सर्वोच्च सन्मान आहे. त्यामुळे आपण या निवड चाचणीत पूर्ण क्षमतेने उतरून स्वतःला सिद्ध करा, असे भारत सरकार राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय कार्यालयाचे संचालक डी. कार्तिगेन म्हणाले.
शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयात गुरुवारी (दि. १७) आयोजित अहमदनगर जिल्ह्यातील प्रजासत्ताक दिन पथसंचलन निवड चाचणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय सेवा योजना राज्यसंपर्क अधिकारी डॉ. प्रभाकर देसाई, अहमदनगर येथील राष्ट्रीय सेवा योजना प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. शरद बोरुडे, रासेयो पुणे जिल्हा समन्वयक डॉ. श्रीकांत फुलसुंदर, प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना अहमदनगर जिल्हा समन्वयक डॉ. प्रताप फलफले आदी उपस्थित होते.
रासेयो पुणे जिल्हा समन्वयक डॉ. फुलसुंदर, डॉ. सचिन कदम व प्रा. हेमलता तारे यांनी स्वयंसेवकांना निवड चाचणी बाबतच्या नियमांबाबत अवगत केले. या निवड चाचणी शिबिरात अहमदनगर जिल्ह्यातून विविध महाविद्यालयांतील ४८ राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. सहभागी स्वयंसेवकांपैकी नियमानुसार तीन मुले व तीन मुलींची विद्यापीठ स्तरासाठी निवड करण्यात आली. प्रास्ताविक डॉ. फलफले यांनी केले. डॉ. रोशन भगत यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डाॅ. बाळासाहेब पालवे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. सागर भिसे, प्रा. सागर श्रीमंदिलकर, दिलीप शरमाळे, अण्णा कांदळकर, अक्षय कुमकर, अंजुषा कासार, रासेयो स्वयंसेवक विशाल जाधव, मयूर आहेर यांनी परिश्रम घेतले. शिबिराचे समन्वयक म्हणून डॉ. सचिन कदम यांनी नियोजन केले होते.