अपघात रोखण्यासाठीही नियमांचे पालन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:38 IST2021-02-21T04:38:24+5:302021-02-21T04:38:24+5:30

रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आयोजित मोफत नेत्रतपासणी व रक्तदान शिबिराने झाला. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ.पोखर्णा बोलत ...

It is also important to follow the rules to prevent accidents | अपघात रोखण्यासाठीही नियमांचे पालन आवश्यक

अपघात रोखण्यासाठीही नियमांचे पालन आवश्यक

रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आयोजित मोफत नेत्रतपासणी व रक्तदान शिबिराने झाला. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ.पोखर्णा बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील होते. कार्यक्रमास आरटीओचे अधिकारी विनोद घनवट, श्रीराम पुंडे, रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष प्रसन्न खाजगीवाले, सचिव ईश्वर बोरा, डॉ.प्रसन्न खणकर, डॉ.गुलशन गुप्ता, राजेश परदेशी, अजय गांधी, चेतन अमरापूकर, उमेश रेखे आदी उपस्थित होते.

या शिबिरात डॉ.खणकर यांनी नेत्र तपासणी करून नेत्र आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. रक्तसंकलनासाठी जनकल्याण रक्तपेढीच्या पथकाने सहकार्य केले.

यावेळी दीपक पाटील म्हणाले यावर्षी रस्ते सुरक्षा अभियान संपूर्ण महिनाभर राबविण्यात आले. यानिमित्त समारोपाला नेत्रतपासणी आणि रक्तदान शिबीर आयोजनासाठी रोटरी सेंट्रलने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. कोणतेही अभियान यशस्वी करण्यासाठी जनतेचा सहभाग आवश्यक असतो. रस्ते सुरक्षा ही निरंतर प्रक्रिया आहे. घराबाहेर पडल्यापासून प्रत्येकाने कायम काळजी घेतली पाहिजे. दुचाकीवर असताना हेल्मेट वापर, कारमध्ये असताना सिटबेल्ट वापरणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळला पाहिजे. आपण घेतलेली काळजी आपल्या कुटुंबियांसाठीही महत्त्वाची असते. कारण काळजी घेतल्यानेच आपण सुरक्षित राहू शकतो. वाहतूकीचे नियम हे कर्तव्य म्हणून पाळले पाहिजे, असे पाटील यांनी सांगितले. प्रास्ताविक ईश्वर बोरा यांनी केले.

फोटो २० शिबिर

ओळी- रस्ता सुरक्षा अभियानाच्या समारोपप्रसंगी रक्तदान करताना आरटीओ कार्यालयातील अधिकारी.

Web Title: It is also important to follow the rules to prevent accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.