गजानन महाविद्यालयास आयएसओ नामांकन
By | Updated: December 5, 2020 04:35 IST2020-12-05T04:35:06+5:302020-12-05T04:35:06+5:30
खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथील श्री छत्रपती शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळाच्या श्री संत गजानन महाविद्यालयास एज्युकेशनल ...

गजानन महाविद्यालयास आयएसओ नामांकन
खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथील श्री छत्रपती शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळाच्या श्री संत गजानन महाविद्यालयास एज्युकेशनल ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट सिस्टीम (आयएसओ) नामांकन मिळाले आहे. संस्थेचे सचिव डॉ. महेश गोलेकर यांनी ग्रामीण भागात हे महाविद्यालय सुरू करून गुणवत्तेबाबत कसलीही तडजोड केली नाही. त्याचे फलित म्हणून जीओटेक ग्लोबल सर्टिफिकेशन प्रा. लिमिटेड व इंटरनॅशनल मॅनेजमेंट ॲक्रीडेएशन बोर्ड यांच्या वतीने महाविद्यालयास आयएसओ नामांकन प्रदान करण्यात आले. नामांकनासाठी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष विजयसिंह गोलेकर, उपाध्यक्ष प्रकाश गोलेकर यांचेही मार्गदर्शन लाभले. याबद्दल प्राचार्य डॉ. शिवानंद जाधव यांनी महाविद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.