गुंदेचा पतसंस्थेचे ईश्वर बोरा यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:16 IST2021-06-20T04:16:03+5:302021-06-20T04:16:03+5:30
यावेळी सभासद विनोद हिरालाल भंडारी म्हणाले, पतसंस्थेच्या २० वर्षांच्या वाटचालीत प्रथमच राज्य स्तरावरील प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळणे ही पतसंस्थेसाठी गौरवास्पद ...

गुंदेचा पतसंस्थेचे ईश्वर बोरा यांचा सत्कार
यावेळी सभासद विनोद हिरालाल भंडारी म्हणाले, पतसंस्थेच्या २० वर्षांच्या वाटचालीत प्रथमच राज्य स्तरावरील प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळणे ही पतसंस्थेसाठी गौरवास्पद बाब आहे. पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवणारे सहकारमहर्षी सुवालाल गुंदेचा यांनी घालून दिलेल्या आदर्शावर संस्थेचे कामकाज सुरू असल्याचे या सन्मानामुळे अधोरेखित होते.
मनोज गुंदेचा म्हणाले, संस्थेची गुंतवणूक १२ वेगवेगळ्या बँकेत केली आहे. एक-दोन बँकांवर विसंबून न राहता अनेक ठिकाणी गुंतवणूक करण्याचे संस्थेचे काम सुरक्षिततेच्या दृष्टीने खरोखर आदर्शवत व अन्य संस्थांसाठी अनुकरणीय आहे. व्यवसाय, व्यापाराला उत्तेजन देण्याचे, आर्थिक पत देण्याचे संस्थेचे धोरण विकास प्रक्रियेला चालना देणारे आहे. व्यापारी वर्गाच्या सुविधेसाठी संस्थेची मार्केट यार्ड शाखा अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे. जवळपास सर्वच बँकिंग सुविधा अतिशय तत्परतेने मिळत असल्याने खातेदारांची चांगली सोय झाली आहे. संस्थेने १५ टक्के लाभांशाची परंपराही कायम पाळली आहे. उत्कृष्ट कामकाजामुळे येत्या काळात संस्था १०० कोटींच्या ठेवीचा विक्रमी पल्ला निश्चित गाठेल. चेअरमन बोरा व व्हाईस चेअरमन शिंगी यांनी सदर पुरस्कार हा सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा यांच्या आदर्शांचा सन्मान असल्याचे तसेच सभासदांच्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे सांगितले. (वा. प्र.)
--------
फोटो- १९ गुंदेचा पतसंस्था
स्व. सुवालाल गुंदेचा पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार मिळाल्याबद्दल चेअरमन ईश्वर बोरा यांचा सत्कार करण्यात आला. समवेत किरण शिंगी, विनोद भंडारी, मनोज गुंदेचा आदी.