निविदा प्रक्रियेत अनियमितता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST2021-06-09T04:25:48+5:302021-06-09T04:25:48+5:30
निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागाने एका कामासाठी निविदा काढली. तिची अंतिम मुदत २२ मे २०२१ रोजी सायंकाळी ...

निविदा प्रक्रियेत अनियमितता
निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागाने एका कामासाठी निविदा काढली. तिची अंतिम मुदत २२ मे २०२१ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत होती. परंतु या निविदेला कमी प्रतिसाद मिळाल्याने द्वितीय कॉलसाठी शासन निर्णयाप्रमाणे आठ दिवसांची मुदत देणे बंधनकारक होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून आठ दिवसांची मुदत देण्याऐवजी केवळ एका रात्रीची म्हणजे २३ मे २०२१ रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंतची मुदत दिली. यावरून निविदा प्रक्रिया मनमानी पद्धतीने राबविण्यात आल्याचे दिसते. याबाबत चौकशी करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी गेले असता संबंधित अधिकाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करून फेर निविदा काढावी, तसेच मागील दोन वर्षांतील निविदा प्रक्रिया, त्याबाबतचे शुद्धीपत्रक याची चौकशी करावी व पदाचा गैरवापर केल्याने संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समीर शेख खजिनदार अक्षय कराड आदींनी केली आहे.