लसीकरणाच्या दुसऱ्या टप्यात फ्रंटलाईन वर्कर म्हणून पत्रकारांचा समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:35 IST2020-12-13T04:35:20+5:302020-12-13T04:35:20+5:30

क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांच्यासह कार्यकारिणी सदस्यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील कोविड लसीकरणाचा मेगाप्लॅन राज्य सरकारने तयार ...

Involve journalists as frontline workers in the second phase of vaccination | लसीकरणाच्या दुसऱ्या टप्यात फ्रंटलाईन वर्कर म्हणून पत्रकारांचा समावेश करा

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्यात फ्रंटलाईन वर्कर म्हणून पत्रकारांचा समावेश करा

क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांच्यासह कार्यकारिणी सदस्यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील कोविड लसीकरणाचा मेगाप्लॅन राज्य सरकारने तयार केला आहे. तीन टप्प्यात ही लसीकरण मोहीम राबविण्याचे नियोजन असून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर म्हणून पोलीस फायर ब्रिगेड, सफाई कर्मचारी, महापालिका कर्मचारी यांचा समावेश आहे. कोरोना महामारीत पत्रकारांनीही जिवाची पर्वा न करता आरोग्य कर्मचारी, पोलीस यांच्या बरोबरीने काम केले आहे. कोरोनाची लागण होऊन काही पत्रकारांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पत्रकारही फ्रंटलाईन वर्कर म्हणून या काळात होते. त्यामुळे लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पत्रकारांचादेखील समावेश करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. हे निवेदन मुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूलमंत्री यांना पाठविण्यात आले आहे.

Web Title: Involve journalists as frontline workers in the second phase of vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.