साई संस्थानच्या रुग्णालयातील औषध घोटाळ्याची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:19 IST2021-03-21T04:19:56+5:302021-03-21T04:19:56+5:30
शिर्डी : साई संस्थानच्या रुग्णालयातील औषध घोटाळ्याची सखोल चौकशी करावी. हॉस्पिटलमधील प्रभारीराज संपवावे. रुग्णालयातील बेबंदशाहीला लगाम घालावा, अशी आग्रही ...

साई संस्थानच्या रुग्णालयातील औषध घोटाळ्याची चौकशी करा
शिर्डी : साई संस्थानच्या रुग्णालयातील औषध घोटाळ्याची सखोल चौकशी करावी. हॉस्पिटलमधील प्रभारीराज संपवावे. रुग्णालयातील बेबंदशाहीला लगाम घालावा, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
संस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांना शनिवारी निवेदन दिले आहे. अलिकडच्या काळात संस्थान रुग्णालये आणि संस्थान प्रशासनाला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. बैठक नियमित घेतली जावी. स्थानिक राजकीय नेत्यांच्या पुढे-मागे धावणाऱ्या हॉस्पिटलमधील प्रभारी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. औषध घोटाळ्याची चौकशी करून या घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधारांवर कारवाई करावी, अशी मागणीही बगाटे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी रमेश गोंदकर, सुधाकर शिंदे, महेंद्र शेळके, संदीप सोनवणे, नीलेश कोते, अमित शेळके, विशाल भडांगे, राहुल कुलकर्णी, प्रकाश गोंदकर, दीपक गोंदकर, राकेश कोते, चंद्रकांत गोंदकर आदी उपस्थित होते.