राहुरी कुलगुरु पदासाठी ३० जणांच्या मुलाखती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:34 IST2021-02-05T06:34:30+5:302021-02-05T06:34:30+5:30
राहुरी : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची वर्णी लागते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले ...

राहुरी कुलगुरु पदासाठी ३० जणांच्या मुलाखती
राहुरी :
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची वर्णी लागते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. कुलगुरू पदासाठी २९ व ३० जानेवारी अशा दोन दिवसात ३० जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू नियुक्तीसंदर्भात तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये हवामान शास्त्रज्ञ लक्ष्मण राठोड, आयसीआयचे संचालक ए. के. सिंग, कृषी सचिव एकनाथ डौले यांचा समावेश आहे. या समितीच्यावतीने ३० जणांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात आल्या आहेत. राहुरी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा यांची मुदत संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. सध्या कुलगुरुपदाचा प्रभारी पदभार अशोक धवन यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे.
....................
राज्यपाल करणार शिफारस
कुलगुरू पदासाठी यंदा कोरोनामुळे ऑनलाइन मुलाखती झाल्या आहेत. मुलाखती घेतलेल्या उमेदवारांमधून समिती पाच किंवा तीन नावे राज्यपालांकडे पाठविणार आहे. त्यानंतर राज्यपाल राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचे नाव घोषित करणार आहेत. त्यामुळे राज्यपाल कुलगुरू पदासाठी कोणाच्या नावाची शिफारस करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.