शक्तीप्रदर्शनात मनसे इच्छुकांच्या मुलाखती
By Admin | Updated: July 15, 2014 00:44 IST2014-07-14T23:01:40+5:302014-07-15T00:44:59+5:30
अहमदनगर: नगर शहरासह दक्षिण मतदारसंघातील इच्छुकांनी शक्ती प्रदर्शन करत सोमवारी पक्षश्रेष्ठींसमोर मुलाखती दिल्या़

शक्तीप्रदर्शनात मनसे इच्छुकांच्या मुलाखती
अहमदनगर: नगर शहरासह दक्षिण मतदारसंघातील इच्छुकांनी शक्ती प्रदर्शन करत सोमवारी पक्षश्रेष्ठींसमोर मुलाखती दिल्या़ शहर मनसेने जनमत चाचणी घेऊन उमेदवार देण्याची मागणी करत पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली़ मतदारसंघनिहाय माहिती घेऊन योग्य उमेदवारी देण्याची ग्वाही पक्षश्रेष्ठींकडून कार्यकर्त्यांना देण्यात आली़
मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने येथील शासकीय विश्रामगृहात विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या़ नगर दक्षिण मधील सहा मतदारसंघातील इच्छुकांना मुलाखतीस उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले होते़ मुलाखतींना सकाळी १० वाजता सुरूवात झाली़ पक्षश्रेष्ठींनी इच्छुकांशी बंद खोलीत चर्चा केली़ तसेच कार्यकर्त्यांच्याही भावना जाणून घेतल्या़ सर्वप्रथम शहरातून मनसेचे स्थायी समिती सभापती किशोर डागवाले, नगरसेवक गणेश भोसले आणि सतीश मैड यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी सरदेसाई यांची भेट घेतली़ यावेळी गणेश भोसले म्हणाले, नगर शहरातील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन उमेदवार द्या़ जनमत चाचणी घेऊन उमेदवार दिल्यास योग्य होईल, असे मत त्यांनी मांडले़ उमेदवार कुणीही द्या़ पण कार्यकर्त्यांना विश्वासात घ्या,अशी मागणी करत जनमत चाचणी घेऊन उमेदवार देण्याच्या मागणीचे निवेदन यावेळी पक्षश्रेष्ठींना शहर मनसेच्या वतीने देण्यात आले़
मुलाखतीकडे इतर पक्षातील कुणीही फिरकले नाही़ सर्व पक्षाचेच पदाधिकारी होते़ यावेळी इच्छुकांकडून प्रचंड शक्तीप्रदर्शन करण्यात आले़ बंद खोलीत मुलाखती घेण्यात आल्या़ मतदारसंघनिहाय आढावा घेऊन अहवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांना सादर केला जाणार आहे़ राज्यातील सर्व मतदारसंघातील आढावा घेऊन अहवाल तयार करण्यात येत असून, उमेदवारीबाबत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार पक्ष प्रमुखांनाच आहेत़ प्रत्येक मतदारसंघात योग्य उमेदवार दिला जाईल, असे शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले़ (प्रतिनिधी)
मतदारसंघनिहाय मुलाखती
शहर- वसंत लोढा, किशोर डागवाले,संजय झिंजे, गणेश भोसले,सतीश मैड, डॉ़ महेश वीर, शेवगाव-पाथर्डी- देविदास खेडकर, नेवासा- दिलीप मोटे, पारनेर- मोहन रांदवण, आनंद शेळके, दगडू शेंडगे, कर्जत- जामखेड- सचिन पोटरे, वैभव जानकावळे, श्रीगोंदा- संजय शेळके, धनंजय कोथिंबिरे,मनोज मैड,ऋषिकेश गायकवाड, राहुरी- ज्ञानेश्वर गाडे
सर्व पक्षातीलच....
मुलाखतीकडे इतर पक्षातील कुणीही फिरकले नाही़ सर्व पक्षाचेच पदाधिकारी होते़ इच्छुकानी शक्तीप्रदर्शन केले़ बंद खोलीत मुलाखती घेण्यात आल्या़ मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला.