युध्दापेक्षा एकीकरण महत्वाचे
By Admin | Updated: June 26, 2023 14:47 IST2014-05-12T00:34:46+5:302023-06-26T14:47:46+5:30
अहमदनगर : युध्दापेक्षा एकीकरण महत्वाचे आहे़ एकीकरण घडविणार्या श्रीकृष्णांचे अनुयायी बना, असे आवाहन प़पू़ प्रवीणऋषी महाराज यांनी रविवारी येथे केले़

युध्दापेक्षा एकीकरण महत्वाचे
अहमदनगर : युध्दापेक्षा एकीकरण महत्वाचे आहे़ लढाईस प्रवृत्त करणार्या शकुनीमामाला साथ देऊन परिणामांना सामोरे जाण्यापेक्षा एकीकरण घडविणार्या श्रीकृष्णांचे अनुयायी बना, असे आवाहन प़पू़ प्रवीणऋषी महाराज यांनी रविवारी येथे केले़ स्टेशन रस्त्यावरील गुरूभक्त सथ्था कॉलनी येथे चांदीबाई मुनोत मेमोरियल सभागृहात सुरू झालेल्या महावीरगाथा सोहळ्यात प्रवचन पुष्प गुंफताना ते बोलत होते़ राजेंद्र चोपडा, आनंदराम मुनोत, माणकचंद गुगळे, तलकसी सावला, रतिलाल गुगळे, अमृतलाल चंगेडिया आदींसह भाविक यावेळी उपस्थित होते़ पुण्य संचयनातून गुरू अपेक्षा न करता मिळतात,याची प्रचिती येते़भगवान श्रीकृष्ण व शकुनी या दोघांनी मामाच्या भूमिका पार पाडल्या आहेत़शकुनी मामा स्वत: लढले नाहीत़ त्यांनी कू टनितीने लढाई घडविली़ मात्र श्रीकृष्ण मामाने रणांगणात उतरुन साथ दिली़ त्यामुळे युध्दापेक्षा एकीकरण महत्वाचे असून,शकुनी मामा नसते तर महाभारतच घडले नसते़ राजमाता कैकयीने दासीचे ऐकले नसते तरी बदनाम झाली नसती़ पूर्वी राजवाड्यामध्ये कोपभवन असायचे़ मन आजारी पडल्यास कोपभवनमध्ये उपचार व्हायचे़ मनातील घाण काढण्यासाठी कोपभवन महत्वाचे होते़ आजच्या आधुनिक युगात घरात कोपभवन राहिले नाही़ त्यामुळे मनावर उपचार होत नाही़मनावर उपचार न होण्याचे काय परिणाम होतात,ते सर्वांसमोर आहे़घरातील प्रमुख मजबूर झाल्यास घराची सर्वनाशाच्या दिशेने वाटचाल होते़मजबूर होऊन कोणतेही समाधान मिळत नाही़घरात शांती व समाधान राहण्यासाठी एकमेकांशी आढेवेढे न घेता सरळ बोला,असा सल्ला प्रवीणऋषी महाराज यांनी यावेळी दिला़ जोपर्यंत गुलामी चेहर्यावरून हटत नाही तोपर्यंत राजसिंहासनावर बसण्याचा अधिकार नाही़ दुर्भाग्याच्या घटना जेव्हा घडतात़ तेव्हा खुर्चीवर बसणारा राजा गुलाम असतो़ जे शासन चालविण्यास योग्य नाही़ त्यांना शासक करणार्या संघाला प्रायश्चित घ्यावे लागते़ मनमोहनसिंग यांच्या लक्षात हे आले असते तर त्यांचे हाल झाले नसते, असे उदाहरण त्यांनी यावेळी दिले़ (प्रतिनिधी)