छावण्यांतील जनावरांसाठी विमा कवच!
By Admin | Updated: May 12, 2016 23:56 IST2016-05-12T23:52:32+5:302016-05-12T23:56:52+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे सरकारी अनुदानावर छावण्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. छावण्यातील जनावरांसाठी सरकारी विमा कवच योजना आहे.

छावण्यांतील जनावरांसाठी विमा कवच!
अहमदनगर : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे सरकारी अनुदानावर छावण्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. छावण्यातील जनावरांसाठी सरकारी विमा कवच योजना आहे. ६०० रुपयांत ३० हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळत आहे. यातील अर्धी रक्कम शेतकरी आणि अर्धी रक्कम सरकार भरीत असल्याने अवघ्या ३०० रुपयांत जनावरांना विमा कवच मिळणार आहे.
जिल्ह्यात सध्या २२ ठिकाणी जनावरांच्या छावण्या सुरू झाल्या असून या ठिकाणी २० हजार जनावरे ठेवण्यात आलेली आहे. यापैकी ८ ते १० छावण्यांना जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे प्रमुख डॉ. भरत राठोड यांनी भेटी दिल्या. त्या ठिकाणी असणाऱ्या त्रुटी पाहून त्यांनी शेतकऱ्यांना आणि छावणी चालकांना पत्र काढले आहे. यात पशुधनाचा विमा उतरविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पशुधन विमा योजना राबवण्यात येत आहे. यात १ लीटर दूध देणाऱ्या जनावराला ३ हजार रुपयांचे विमा कवच देण्यात येत आहे. तर १० लीटर दूध देणाऱ्या जनावराला ३० हजार विमा कवच आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्यांना विमा कवचाच्या सव्वा दोन टक्के विमा हप्ता ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे ३० हजारांसाठी ६०० ते ६२५ रुपये विमा हप्ता लागू राहणार आहे. यातील अर्धी रक्कम पशुसवंर्धन विभाग भरत असल्याने अवघ्या ३०० रुपयांत जनावरांना ३० हजार रुपयांचे विमा कवच मिळणार आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. राठोड यांनी केले आहे.