दहावीतील मुलाने बनविले फिजिओथेरपीमधील यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST2021-06-04T04:16:38+5:302021-06-04T04:16:38+5:30
शनेशराजे संदीप कडू हा डॉ. विखे पाटील फाऊंडेशनच्या इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्याने ...

दहावीतील मुलाने बनविले फिजिओथेरपीमधील यंत्र
शनेशराजे संदीप कडू हा डॉ. विखे पाटील फाऊंडेशनच्या इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्याने " डीजीगोनिओमीटर" हे यंत्र तयार केले आहे. या यंत्राच्या पेटंटबाबतचा प्रस्ताव शनेशराजे याचे वडील डॉ. संदीप व आई डॉ. स्वाती कडू यांनी केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाला पाठविला. हा प्रस्ताव त्यांनी ४ जानेवारी २०२१ रोजी दाखल केला.
बायो मेडिकल इंजिनिअरिंग याअंतर्गत हा प्रस्ताव होता. केंद्र सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानंतर पेटंट कार्यालयाने ३० एप्रिल २०२१ रोजी शासकीय जर्नलमध्ये या यंत्राला पेटंट देण्यात आल्याची घोषणा केली. या यंत्राला "शनेशचे डीजीगोणियो" हे नाव देण्यात आले आहे. "डीजीगोनिओ मीटर" हे यंत्र हात, पाय व सांधे यांचे मोजमाप करते. हे यंत्र फिजिओथेरपीमध्ये वापरले जाते. तसेच हे यंत्र फ्रॅक्चर व अर्धांगवायूच्या उपचारासाठीसुद्धा उपयोगी आहे.
...........................
पेटंटची घरातच हॅट्ट्रिक
२०१५ मध्ये डॉ. स्वाती संदीप कडू यांनी मानदुखी कमी करण्यासाठी धान्य भरण्याच्या आठव्याची उशी तयार केली. त्यानंतर २०२० मध्ये डॉ. संदीप सीताराम कडू यांनी भारतातील पहिले न्याय वैद्यक शास्त्राचे डिजिटल म्युझियम बनवले आहे. या दोन्ही उपक्रमांना पेटंट मिळाले आहे. या डॉक्टर दाम्पत्याचा मुलगा शनेशराजे यानेही फिजिओथेरपीमधील यंत्राला पेटंट मिळवून हॅट्ट्रिक साधली आहे.
फोटो : ०३शनेशराजे कडू