नियमांचे पालन करून विशाल गणपती मंदिरात प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:27 IST2021-09-10T04:27:27+5:302021-09-10T04:27:27+5:30

अहमदनगर : राज्यासह देशात कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षापासून अनेक गोष्टींवर निर्बंध आले आहेत. राज्यातील मंदिरे अनेक दिवसांपासून बंद आहेत. ...

Installation in the huge Ganapati temple following the rules | नियमांचे पालन करून विशाल गणपती मंदिरात प्रतिष्ठापना

नियमांचे पालन करून विशाल गणपती मंदिरात प्रतिष्ठापना

अहमदनगर : राज्यासह देशात कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षापासून अनेक गोष्टींवर निर्बंध आले आहेत. राज्यातील मंदिरे अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे यंदाही गणेशोत्सव हा अगदी साध्या पद्धतीने शासनाच्या कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन साजरा करण्यात येणार आहे. शुक्रवारी श्रीगणेश चतुर्थी दिनी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते ‘श्री’ची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांनी दिली.

मंदिरात दहा दिवस नित्यनियमाने पूजा, आरती करण्यात येईल. हे सर्व गणेश भक्तांना ऑनलाईन पाहता येणार आहे. मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच यावर्षी विसर्जन मिरवणुकीवरही बंदी असल्याने साध्या पद्धतीने श्री गणेशाचे विसर्जन होईल. हा उत्सव पार पाडण्यासाठी देवस्थानचे पुजारी संगमनाथ महाराज, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त विजय कोथिंबीरे, पांडुरंग नन्नवरे, बापूसाहेब एकाडे, गजानन ससाणे, हरिश्चंद गिरमे, ज्ञानेश्वर रासकर, चंद्रकांत फुलारी, रंगनाथ फुलसौंदर, प्रकाश बोरुडे, भाऊसाहेब फुलसौंदर, शिवाजी शिंदे आदी प्रयत्नशील आहेत.

--

फोटो- ०९ विशाल गणपती

Web Title: Installation in the huge Ganapati temple following the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.