शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:13 IST2021-02-19T04:13:35+5:302021-02-19T04:13:35+5:30
श्रीरामपूर : शहरातील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवावा, या मागणीसाठी संघर्ष समितीच्या वतीने नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश ...

शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवा
श्रीरामपूर : शहरातील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवावा, या मागणीसाठी संघर्ष समितीच्या वतीने नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले. पालिकेने यासंदर्भात परिपूर्ण ठराव करून सरकारकडून परवानगी घ्यावी अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.
विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप शिरसाठ, मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, हिंदू एकता आंदोलनचे सुदर्शन शितोळे, छावाचे सुभाष जगले ,राजेंद्र बोलकर, श्रीराम सेवा संघाचे कुणाल करंडे, शिव प्रतिष्ठानचे नागेश सोनवणे, प्रवीण पैठणकर, किशन ताकटे ,विश्व हिंदू परिषदेचे शहराध्यक्ष योगेश ओझा, बजरंग दलाचे बाळासाहेब हरदास, बाजार समितीचे संचालक मनोज हिवराळे आदी यावेळी उपस्थित होते.
पालिकेला या प्रश्नी निवेदन देण्यापूर्वी कार्यकर्त्यांची शहरातील मोकाशी दत्त मंदिरात बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत पुढील आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यात आली. पालिकेचे सत्ताधारी व विरोधक यांनी पुतळ्याप्रश्नी केवळ वेळकाढूपणा केला. प्रत्यक्षात कुठलेही ठोस पाऊस उचलले नाही. त्यामुळे पंधरा दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा पालिकेने ठराव करावा अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल. अन्य जागेचा प्रस्ताव स्वीकारला जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी दत्ता कांदे, विष्णू मोढे, प्रवीण फरगडे, बाळासाहेब हिवराळे, बबन जाधव, सोमनाथ पतंगे, सोमनाथ कदम, गणेश भिसे, संजय यादव, चंद्रशेखर आगे, संदीप पवार, विवेक देशमुख, सुहास पवार, राजू पडवळकर, दर्शन चव्हाण, रवींद्र चव्हाण, राहुल अस्वले, विकी देशमुख आदी उपस्थित होते.
---------
फोटो ओळी : आंदोलन
पालिकेने शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसवावा, या मागणीसाठी संघर्ष समितीने गुरुवारी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले.