नाशिक विभागाचे पोलिस महानिरिक्षक प्रताप दिघावकर यांनी राहुरी पोलिस ठाणेच्या कामकाजाचा आढावा घेतला. तालुक्यातील गुन्हेगारी व पोलिसांच्या अडीअडचणी, कायदा व सुवेवस्थे बाबत माहिती घेत सुचना केल्या.
राहुरी पोलिस ठाण्यात पोलिस महानिरिक्षक डाॅ. प्रताप दिघावकर यांचे अप्पर पोलिस अधिक्षक दिपाली काळे व पोलिस निरिक्षक हनुमंत गाडे यांनी गुलाब पुष्प देवुन स्वागत केले.यावेळी पोलिस अधिक्षक मनोज पाटील, उपअधिक्षक संदिप मिटके उपस्थित होते. राहुरी पोलिस वसाहतीत जावुन पडझड झालेल्या घराची पाहणी करत सुचना केल्या. जप्त असलेली व बेवारस पडुन असलेल्या वाहानांची विल्लेवाट लावण्याच्या सुचना केल्या. अप्पर पोलिस अधिक्षक दिपाली काळे, पोलिस निरिक्षक हनुमंत गाडे यांना सुचना केल्या. देवळाली प्रवरा येथिल नविन पोलिस ठाण्याबाबत आप्पासाहेब ढुस व राष्ट्रिय जल पुरस्कार प्राप्त असलेले शिवाजी घाडगे यांनी डाॅ दिघावरकर यांच्याशी चर्चा केली.