अहमदनगर : भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूसंदर्भात सायरबर तज्ज्ञ सईद शुजा यांनी लंडन येथे काल दिलेली माहिती धक्कादायक आहे. त्यामुळे मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी आंतरराष्ट्रीय पातळीवरुन व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.२०१४ च्या निवडणुकीत ईव्हीएम हॅक करून भाजपाने विजय मिळविला. हे गुपित गोपीनाथ मुंडे यांना माहित होते़ ते कधीही उघड होेऊ शकते़ त्यामुळेच मुंडे यांची हत्या करण्यात आली. त्यांच्यासोबत इतरही १२ लोकांची हत्या झाली आहे, हा शुजा यांचा दावा विचारात घेण्याजोगा आहे. कारण, जर मुंडे यांचा मृत्यू अपघातात झाला होता तर मग त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरवर कारवाई का झाली नाही? अशी विचारणा त्यांनी केली.दरम्यान, लोकसभेसाठी राष्ट्रवादी-काँगे्रसची आघाडी झाली आहे़ ४८ पैकी ४४ जागांवर निर्णय झाला असून, ४ जागांचा निर्णय दिल्लीत होईल़, असे जयंत पाटील म्हणाले़
गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी - जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 04:22 IST