पर्यावरण संवर्धनासाठी कल्पक उपक्रम उल्लेखनीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:14 IST2021-07-02T04:14:46+5:302021-07-02T04:14:46+5:30
कोपरगाव : कला, सांस्कृतिक,पर्यावरण विविध कल्पक उपक्रम लोकसहभागातून आयोजित केले जातात. सूर्यतेज सामाजिक संस्थेच्या वतीने संस्कृती-परंपरा आणि पर्यावरण ...

पर्यावरण संवर्धनासाठी कल्पक उपक्रम उल्लेखनीय
कोपरगाव : कला, सांस्कृतिक,पर्यावरण विविध कल्पक उपक्रम लोकसहभागातून आयोजित केले जातात. सूर्यतेज सामाजिक संस्थेच्या वतीने संस्कृती-परंपरा आणि पर्यावरण संवर्धनाचे कल्पक उपक्रम प्रेरणादायी असल्याचे कोपरगाव येथील सामाजिक वनीकरणाच्या वन क्षेत्रपाल पूजा रक्ताटे यांनी म्हटले आहे. कोपरगाव येथील सूर्यतेज संस्था आयोजित कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत दीपावली-पाडवा घर तेथे रांगोळी स्पर्धा-२०२० ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे प्रातिनिधिक पारितोषिक वितरणासोबत स्वच्छ-जलशक्ती-हरित पर्यावरण अभियान-२०२१ व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे आवाहनाला प्रतिसाद म्हणून एक व्यक्ती-एक झाड प्रातिनिधिक मोफत वितरण करण्यात येत आहे. त्याप्रसंगी रक्ताटे बोलत होत्या.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतिभा सोनवणे, सूर्यतेज ज्येष्ठ मार्गदर्शिका लता भामरे, ॲड. स्मिता जोशी, आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. राजेंद्र वाघडकर, डॉ. नीलिमा आव्हाड, रश्मी जोशी, मंगला राजेभोसले, दीपाली पटवर्धन, सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके, अनिल अमृतकर उपस्थित होते. याप्रसंगी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या संतांचे विचार मुद्रित केलेल्या पर्यावरणपूरक कापडी पिशवीचे अनावरण करण्यात आले आहे. तसेच भूलतज्ज्ञ पदवी संपादन केलेल्या डॉ. मुग्धा हेमंत पटवर्धन यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. उर्वरित बक्षीस विजेत्यांना पारितोषिक व रोप वितरण घरपोच करण्यात येणार आहे. या उपक्रमास प्रा. दत्तात्रेय गवळी, सरिता कोर्हाळकर, अभिजित शिरोडे, ॲड. महेश भिडे, किरण शिरोडे यांचे सहकार्य लाभले. प्रा. अतुल कोताडे, मतीन दारुवाला, सुरेखा आव्हाड, सीमा भिडे, माधवी पेटकर, पल्लवी भगत, दर्शना हलवाई, कल्पेश टोरपे, महेश थोरात, वंदना अलई यांचे सह सूर्यतेज परिवारचे सदस्य सहकार्य करणार आहे. सूत्रसंचालन ऐश्वर्या बिडवे यांनी केले.
फोटो०१- रांगोळी स्पर्धा पारितोषिक