लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी नगरसेवक बिहाणी यांचा अभिनव उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:21 IST2021-04-20T04:21:15+5:302021-04-20T04:21:15+5:30
नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसह लसीकरण झाल्यानंतर रुग्णालयातून घरापर्यंत आणून सोडण्याचे बिहाणी यांचे काम लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी उपयोगी ठरत आहे. ...

लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी नगरसेवक बिहाणी यांचा अभिनव उपक्रम
नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसह लसीकरण झाल्यानंतर रुग्णालयातून घरापर्यंत आणून सोडण्याचे बिहाणी यांचे काम लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी उपयोगी ठरत आहे. त्याबरोबरच नागरिकांनाही दिलासा मिळत आहे.
नगरसेवक बिहाणी यांनी शहरातील प्रभाग १५ परिसरात मोहिमेची नुकतीच सुरुवात केली. ते कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी पुढाकार घेत प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या घरी जाऊन विचारपूस करीत आहेत. कोरोनावर लसीकरण फायदेशीर ठरत असून प्रभागामध्ये त्याबाबतचे मार्गदर्शन केले जात आहे. ४५ वर्षांपुढील नागरिकांसह वयोवृध्दांना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्याचे कार्य नगरसेवक बिहाणी करीत आहे.
लसीकरणासाठी शिरसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात जाण्यासाठी वाहनाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे गरीब नागरिकांना पायपीट करावी लागते. त्यासाठी कोणतीही सरकारी वाहन व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे ही अडचण ओळखून बिहाणी हे मदतीसाठी धावले आहेत.
लसीकरणासाठी जाताना पिण्याचे पाणी व घरपोच सोडण्याची व्यवस्था यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, बिहाणी यांनी कोरोना उपचार केंद्रांना स्वखर्चाने पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची भेट दिली आहे. त्याचा रुग्णांना प्रत्यक्ष लाभ होणार आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये प्रशासनाने शहरातील संतलूक रुग्णालयात उपचार केंद्र सुरू केले होते. त्यावेळी रुग्णांच्या जेवणाची सर्व व्यवस्था बिहाणी यांनी उचलली होती. संकटकाळी सर्वसामान्यांच्या मदतीला धावून गेल्याने शहरवासीयांनी बिहाणी यांचे आभार मानले आहेत.
..........
फोटो आहे : १९०४ २०२१ श्रीनिवास बिहाणी