राहुरी: राहुरी शहर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. शहरातील तब्बल ३६ रूग्णालयांनी अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण काढा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राहुरी नगर पालिकेने रूग्णालय चालविणा-या डॉक्टरांना दिला आहे़ राहुरी शहरातील रूग्णालयांच्या अतिक्रमणाबाबत नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती़ विभागीय आयुक्तांनी अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा प्रशासन अधिका-यांना याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने राहुरी नगर नगरपालिकेचे मुख्याधिकारी नानासाहेब महानवार यांना नोटीसव्दारे कारवाई करण्याचे आदेश दिले होते़ महाराष्ट्र नगर परिषद व औद्योगिक अधिनियम १९६५ चे कलम १८९ ,महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२,५३़,५४ व ५५ नुसार रूग्णालयास नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सुरू करण्यात आलेल्या रूग्णालयांमध्ये पार्किंगची सुविधा नाही. अनाधिकृत बांधकाम करण्यात आलेले आहे. त्यामुळे ये-जा करणा-या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे़ एक महिन्याच्या आत अनाधिकृत बांधकाम पाडून टाकण्यात यावे व पार्किंगची सुविधा करण्यात यावी, असे पालिका मुख्याधिका-यांनी रुग्णालयांना बजावलेल्या नोटिसांमध्ये म्हटले आहे. ..............................................अतिक्रमण प्रकरणी राहुरी शहरातील ३६ रूग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पार्किंंगच्या जागेचा वापर ओपीडी किंवा मेडीकल स्टोअर्ससाठी करण्यात आला आहे़ वरिष्ठांच्या आदेशानुसार संबंधितांना एक महिन्यात अतिक्रमण काढण्याची नोटीस दिली आहे़ एक महिन्यात अतिक्रमण न काढल्यास राहुरी नगर पालिका अतिक्रमण काढील़- नानासाहेब महानवार, मुख्याधिकारी, राहुरी नगरपालिका.
राहुरीत ३६ रूग्णालयांचे अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 16:29 IST
राहुरी: राहुरी शहर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. शहरातील तब्बल ३६ रूग्णालयांनी अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण काढा, अन्यथा कायदेशीर कारवाई ...
राहुरीत ३६ रूग्णालयांचे अतिक्रमण
ठळक मुद्देराहुरी नगरपालिकेची नोटीसशहर अतिक्रमणांच्या विळख्यात