संगमनेरात अतिक्रमण हटाव मोहिम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 13:27 IST2018-10-29T13:27:11+5:302018-10-29T13:27:34+5:30
संगमनेर नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (२९ आॅक्टोबर) शहरात अतिक्रमण हटाव मोहिम सुरू केली आहे.

संगमनेरात अतिक्रमण हटाव मोहिम सुरू
संगमनेर : संगमनेर नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (२९ आॅक्टोबर) शहरात अतिक्रमण हटाव मोहिम सुरू केली आहे.
या मोहिमेत शहरातील अतिक्रमित टपऱ्या, दुकानांच्या समोरील पाल हटविण्याबरोबरच भारतनगर परिसरातील अवैध कत्तलखाने उध्वस्त केल्याचे मुख्याधिकारी डॉ. बांगर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सोमवारी सकाळी दहावाजेपासून अतिक्रमण हटाव मोहिमेस सुरवात झाली. काही किरकोळ अपवाद वगळता मोहिम सुरळीत सुरू आहे. काही व्यावसायिक व नागरिक स्वत:हून अतिक्रमण काढून घेत आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.