तरुणाचा अमानुषपणे खुन; शरीराचे अक्षरशः तुकडे करून गोण्यात भरून नदीत फेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 12:15 IST2020-07-02T12:15:29+5:302020-07-02T12:15:42+5:30

राजूर:-अकोले तालुक्यातील वाकी शिवारात एका अद्यात तरुणाचा अमानुषपणे खुन करून त्याच्या शरीराचे अक्षरशः तुकडे तुकडे करून दोन गोण्यात भरून ...

Inhuman murder of a youth in Akole taluka; The body was literally cut into pieces and stuffed into sacks and thrown into the river Krishnavanti | तरुणाचा अमानुषपणे खुन; शरीराचे अक्षरशः तुकडे करून गोण्यात भरून नदीत फेकले

तरुणाचा अमानुषपणे खुन; शरीराचे अक्षरशः तुकडे करून गोण्यात भरून नदीत फेकले

राजूर:-अकोले तालुक्यातील वाकी शिवारात एका अद्यात तरुणाचा अमानुषपणे खुन करून त्याच्या शरीराचे अक्षरशः तुकडे तुकडे करून दोन गोण्यात भरून कृष्णावंती नदीच्या पात्रात फेकून दिल्याचे गुरुवारी सकाळी आढळून आले. दरम्यान या घटनेमुळे वाकी परिसरात खळबळ उडाली आहे. या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की वाकी शिवरातून जात असलेल्या कृष्णावंती नदीच्या पात्राच्या कडेला दोन गोण्यात काही तरी भरून फेकले होते.त्याची दुर्गंधी येत असल्याचे लक्षात येताच वाकीचे पोलीस पाटील सोमनाथ सगभोर यांनी ही घटनेची माहिती राजूर पोलीस ठाण्यास कळवली. माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील,पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्या ठिकाणी एका 20 ते 25 वयोगटातील एका अज्ञात तरुणाच्या शरीराचे तुकडे तुकडे करून ते तुकडे दोन गोण्यात भरून फेकून दिल्याचे आढळून आले असल्याचे सपोनि पाटील यांनी सांगितले .त्याच्या मृतदेहाच्या तुकड्यांच्या गोण्या पोलीस कर्मचारी राजूर येथे घेऊन येत आहेत. पुढील तपास सपोनि पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: Inhuman murder of a youth in Akole taluka; The body was literally cut into pieces and stuffed into sacks and thrown into the river Krishnavanti