जामखेड तालुक्यातील २५ गावात कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:22 IST2021-04-04T04:22:07+5:302021-04-04T04:22:07+5:30

जामखेड : तालुक्यातील १ मार्चपासून ३ एप्रिलपर्यंत ६७२ कोरोना बाधित आढळले असून त्यातील ४०२ रुग्ण उपचार करून घरी सोडण्यात ...

Infiltration of corona in 25 villages of Jamkhed taluka | जामखेड तालुक्यातील २५ गावात कोरोनाचा शिरकाव

जामखेड तालुक्यातील २५ गावात कोरोनाचा शिरकाव

जामखेड : तालुक्यातील १ मार्चपासून ३ एप्रिलपर्यंत ६७२ कोरोना बाधित आढळले असून त्यातील ४०२ रुग्ण उपचार करून घरी सोडण्यात आले आहेत. २७० रुग्णांवर अरोळे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील २५ गावात कोरोनाने शिरकाव केला आहे.

जामखेड शहरासह दिघोळ, पाडळी या गावात मोठ्या प्रमाणावर रूग्ण संख्या आहे. ३ एप्रिलला १०५ रुग्ण आढळून आले. १ मार्च ते २ एप्रिल पर्यंतच्या कालावधीत ही सर्वात मोठी रुग्ण वाढ आहे.

तालुक्यातील दिघोळ हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असून त्या गावातील रुग्ण संख्या २९६ वर गेली आहे. त्यामुळे प्रशासन कोरोना रोखण्यात शर्थीचे प्रयत्न करत आहे. दिघोळ गावातील प्रत्येक कुटुंबाची कोरोना चाचणी घेण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यापाठोपाठ जामखेड शहरात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून ३ एप्रिलपर्यंत २७६ रुग्णसंख्या झाली.

आरोग्य अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस प्रशासन हे दिघोळ व जामखेड येथील कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवून बाधित रुग्णांचा शोध घेत आहेत.

जामखेड शहरातील कला केंद्रातील कलावंताची, वाद्यवृंद यांची चाचणी घेतली आहे.

तालुक्यातील २५ गावांमध्ये कोरोनाने पाय पसरले आहेत. तालुक्यातील दिघोळ, पाडळी, जामखेड, कुसडगाव, खर्डा, फकराबाद, जवळा, बोरले, रेडेवाडी, पिंपरखेड, सारोळा, सोनेगाव, शिऊर, लेहेनेवाडी, जवळा,

बराणपूर, हळगाव, साकत, जांबवाडी, रत्नापूर, घोडेगाव, सरदवाडी, मतेवाडी, सावरगाव आदी गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

तालुक्यात एकूण ६७२ कोरोना रुग्णसंख्या झाली आहे. अरोळे हॉस्पिटलमध्ये सद्य:स्थितीला २७० रुग्ण उपचार घेत आहेत. अरोळे हॉस्पिटलमध्ये एकूण ३८० बेडची क्षमता असून आणखी १०० बेड वाढवण्याच्या दृष्टीने आमदार राेहित पवार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या ५० बेड बेड शिल्लक आहेत.

--

४ हजार ३६१ जणांना कोरोना लसीकरण..

तालुक्यातील ६० वयोगटातील १ हजार ८२६ नागरिकांना तर ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांना ८२४ व फ्रंटलाईन कर्मचारी आरोग्य व अंगणवाडी सेविका एकूण ७१९ पैकी ६३३ कर्मचाऱ्यांनी लस घेतली. तहसील, पंचायत समिती, कृषी, पोलीस, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम अशा एकूण ९७८ अधिकारी व कर्मचारी यांचे लसीकरण करण्यात आले. तालुक्यात २ एप्रिलपर्यंत ४ हजार ३६१ इतक्या अधिकारी, नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे.

--

२१ दुकानांवर ७ दिवस बंदची कारवाई..

जिल्हाधिकारी यांनी देलेल्या आदेशाने तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी जामखेड शहरातील १४ तर खर्डा येथील ७ अशा एकूण २१ दुकानांवर कोरोनाचे नियम न पाळल्याने कारवाई केली. ही दुकाने सात दिवस बंद केले.

Web Title: Infiltration of corona in 25 villages of Jamkhed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.