कामरगाव ग्रामपंचायतीत पंचवीस वर्षांनंतर सत्तांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:21 IST2021-01-25T04:21:36+5:302021-01-25T04:21:36+5:30

निंबळक : कामरगाव (ता. नगर) येथील नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पंचवीस वर्षांनंतर सत्तांतर झाले. सत्ताधारी ग्रामविकास पॅनलचा पराभव ...

Independence after 25 years in Kamargaon Gram Panchayat | कामरगाव ग्रामपंचायतीत पंचवीस वर्षांनंतर सत्तांतर

कामरगाव ग्रामपंचायतीत पंचवीस वर्षांनंतर सत्तांतर

निंबळक : कामरगाव (ता. नगर) येथील नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पंचवीस वर्षांनंतर सत्तांतर झाले.

सत्ताधारी ग्रामविकास पॅनलचा पराभव झाला तर माजी सरपंच वसंतराव ठोकळ, माजी सरपंच अशोक ठोकळ, शामराव आंधळे, युवा नेते राजेंद्र मथुजी आंधळे यांनी पुरस्कृत केलेल्या आजी-माजी सैनिक संघटनेच्या कामक्षा जय जवान जय किसान पॅनलने सात जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळविले.

माजी सरपंच रावसाहेब साठे यांच्या गटाला तीन जागा मिळाल्या. कामक्षा जय जवान जय किसान या पॅनलचे उमेदवार शंभर ते दोनशे मतांच्या फरकाने विजयी झाले.

तुकाराम कातोरे, संदीप ढवळे, आशाताई ठोकळ, मंगल साठे, अश्विनी ठोकळ, पूजा लष्करे आदी विजयी झाले. सत्ता परिवर्तनासाठी माजी सरपंच वसंतराव ठोकळ, माजी सरपंच अशोक ठोकळ, आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश ठोकळ, उपाध्यक्ष अनिल आंधळे, सचिव पोपट ठोकळ, शामराव आंधळे, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे, राम नानेकर, सावता परिषद जिल्हाध्यक्ष गणेश बनकर, युवा नेते अंकुश ठोकळ, शिवा सोनवणे, ॲड. प्रशांत साठे, विठ्ठल जाधव, प्रकाश कातोरे, सुदाम ठोकळ, हिरामण शिंदे, संदीप लष्करे, चंद्रकांत सुतार आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Independence after 25 years in Kamargaon Gram Panchayat