‘लोकमत’च्या मोहिमेतून एकात्मतेचे नाते वृद्धिंगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:16 IST2021-07-11T04:16:10+5:302021-07-11T04:16:10+5:30
लोकमतचे संस्थापक-संपादक व स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महारक्तदान मोहिमेंतर्गत शनिवारी (दि.१०) लोकमत व जिल्हा पोलीस प्रशासन ...

‘लोकमत’च्या मोहिमेतून एकात्मतेचे नाते वृद्धिंगत
लोकमतचे संस्थापक-संपादक व स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महारक्तदान मोहिमेंतर्गत शनिवारी (दि.१०) लोकमत व जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पोलीस मुख्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, ‘लोकमत’चे आवृत्तीप्रमुख सुधीर लंके, पोलीस उपअधीक्षक (गृह) बाजीराव पोवार, पोलीस निरीक्षक (राखीव) दशरथ हटकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक अनिल कटके, निरीक्षक बी. व्ही. पाटील, लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक सुदाम देशमुख आदी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले कोरोनावर मात करत असताना डॉक्टरांसह पोलिसांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. दिवसरात्र रस्त्यावंर उभा राहून पोलिसांनी नियमांची अंमलबजावणी केली. त्याचमुळे कोरोनाची लाट थोपविण्यात आपण यशस्वी ठरलो. कोरोनाकाळात थांबलेल्या शस्त्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याने सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत लोकमतने संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केलेली रक्तदान माेहीम गरजू रुग्णांसाठी मोठा आधार ठरणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून आपण सर्व एक आहोत हे प्रतित झाले आहे. या मोहिमेत जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांनीही योगदान दिले आहे, असे ते म्हणाले. सुधीर लंके यांनी प्रास्ताविक केले. आभार उपअधीक्षक बाजीराव पोवार यांनी मानले. उपसंपादक अरुण वाघमोडे यांनी सूत्रसंचलन केले. अहमदनगर ब्लड बँकेच्या वतीने शिबिरात रक्तसंकलन करण्यात आले.
--------------------------------------
शिबिरातील रक्तदाते
पोलीस निरीक्षक दशरथ हटकर, पोलीस कर्मचारी सतीश शिंदे, रामदास भांडवलकर, अजय कदम, रवींद्र कदम, रवींद्र पाचारणे, समीर फकीर, शरद गावडे, रामचंद्र होले, अनिश शेख, सचिन गणगे, शफी शेख, तहसीन शेख, रवींद्र कांबळे, संतोष धांडे, राजेंद्र धांडे, राजेंद्र गाडे, सावता साखरे, प्रणव चव्हाण, सोमनाथ सोनटक्के, विलास पवार, बाळासाहेब बनकर, रवींद्र मेढे, कृष्णा बडे, सुजित सरोदे, अच्युत चव्हाण, दीपक रोहकले, रवी पवार, हृदय घोडके, आनंद घोडके, अनिल साठे, अमोल साळवे, स्वाती तांदुळकर, दिगंबर भोरे, सलमान शेख, इजाज सय्यद, दादाराम म्हस्के, भारत जाधव, ज्ञानेश्वर झिने, सागर भालेराव, अनुप झाडबुके, ज्ञानेश्वर तांदळे, किरण राठोड, नीता थोरात, राहुल पोळ, सलमान कादरी, श्याम बनकर, गौतम दिवेकर, राहुल म्हस्के, भागिरथ देशमाने, श्रीकांत शिंदे, आयुब शेख, अर्जुन बडे.