मजूर सहकारी संस्थांच्या कामांच्या मर्यादेत १५ लाखांपर्यंत वाढ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:31 IST2021-02-26T04:31:09+5:302021-02-26T04:31:09+5:30
पारनेर : महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक मजूर सहकारी संस्थांच्या कामाच्या मर्यादेत १५ लाखांपर्यंत वाढ करण्यात यावी, अशी आग्रही मागणी जिल्हा ...

मजूर सहकारी संस्थांच्या कामांच्या मर्यादेत १५ लाखांपर्यंत वाढ करा
पारनेर : महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक मजूर सहकारी संस्थांच्या कामाच्या मर्यादेत १५ लाखांपर्यंत वाढ करण्यात यावी, अशी आग्रही मागणी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे भेट घेऊन केली आहे.
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत बिगर शेती मतदारसंघातून निवडून आलेले नवनिर्वाचित संचालक प्रशांत गायकवाड यांनी मुंबई येथे देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांची भेट घेऊन आभार मानले. त्यावेळी या मतदारसंघातून उमेदवारी मागताना मजूर संस्था व पतसंस्थांच्या चळवळीत काम करण्याच्या प्रतिनिधीला उमेदवारी मिळावी, अशी मागणी करण्यात आलेली होती. त्यावर महाविकास आघाडीच्या सर्वच नेते मंडळींनी प्रशांत गायकवाड यांना उमेदवारी देऊन विश्वास दाखविला होता. त्या विश्वासास प्रात्र राहून भरघोस मतांनी विजय संपादन करून पहिल्याच दिवशी मजूर संस्थांच्या मागण्यांचे निवेदन अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना देण्यात आले.
राज्यातील मजूर सहकारी संस्थांबाबत अनेक अडचणी असून, महत्त्वाचे म्हणजे थेट काम वाटप करताना १० वर्षांपूर्वी १५ लाखांची कामे दिली जात होती. मागील सरकारच्या काळात ही मर्यादा तीन लाख करण्यात आली. वास्तविक पाहता सिमेंट, लोखंड, खडी, वाळू, डबर यांच्या वाढलेल्या किमती पाहता तीन लाखांत कोणतेही काम होणे शक्य नाही. त्यामुळे कामांच्या मर्यादेत १५ लाखांची वाढ होण्यासाठी तत्कालीन विधानसभा सभापती नानासाहेब पटोले यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात अनेक बैठका झाल्या आहेत.