भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शहराध्यक्ष सचिन शिंदे, गटनेते अशोक गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके, मंगेश त्रिभुवन, सुजित गोंदकर, विजय जगताप, दत्तात्रय कोते, रवींद्र गोंदकर, रवींद्र कोते, अशोक गायके यावेळी उपस्थित होते.
सध्या शिर्डीत केवळ साईबाबा संस्थानच्या साईआश्रम-१ या भक्तनिवासात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. त्यातही आठवड्यातून एखादे दुसऱ्या दिवशी या ठिकाणी सशुल्क लस उपलब्ध असते. येथे १०० लस येतात. दोन-तीनशे नागरीक रांगेत असतात. अनेक नागरिकांना तास न् तास रांगेत उभे राहून लस न घेताच परतावे लागते. याशिवाय कोणत्या दिवशी कोणत्या कंपनीची लस उपलब्ध आहे याची माहितीही सार्वजनिक केली जात नाही. यामुळे तिथे गेल्यावर वेगळ्या कंपनीची लस असेल तर रांगेत नंबर येऊनही काही उपयोग होत नाही.
या बाबी विचारात घेऊन एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरातील विविध भागात केंद्रे सुरू करावीत, नागरिकांच्या माहितीसाठी लसीची कंपनी व उपलब्धता याची माहिती सार्वजनिक करावी, तसेच शहरातील अनेक नागरिकांना रोजगार नसल्याने सशुल्क लस घेणे शक्य नाही. त्यामुळे अन्य शहराप्रमाणे शिर्डीतही सरकारी लसीकरण केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.