पाथर्डी शहरात सीसीटीव्हींची संख्या वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:17 IST2021-06-04T04:17:09+5:302021-06-04T04:17:09+5:30
पाथर्डी : शहरातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी मागील काळात शहरात नावीन्यपूर्ण योजनेतील निधीमधून बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या जाळ्यांची व्याप्ती वाढवावी. प्रत्येक ...

पाथर्डी शहरात सीसीटीव्हींची संख्या वाढवा
पाथर्डी : शहरातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी मागील काळात शहरात नावीन्यपूर्ण योजनेतील निधीमधून बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या जाळ्यांची व्याप्ती वाढवावी. प्रत्येक उपनगरात मोक्याची ठिकाणे हेरून आगामी काळात उपलब्ध होणाऱ्या निधीमधून अधिकाधिक सीसीटीव्ही बसवावेत, अशा आशयाचे निवेदन नगरसेवक प्रसाद आव्हाड यांनी मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना दिले.
यावेळी विजय शिंदे, निखिल घोडके, धनंजय थोरात, प्रशांत शेळके, प्रसाद देशमुख, मयूर खेडकर आदी उपस्थित होते. मुख्याधिकारी कोळेकर यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आगामी काळात प्राधान्याने हा विषय मार्गी लावणार असल्याचे सांगितले. मागील आठवड्यात भगवाननगर परिसरात रात्रीच्या वेळी एका दुचाकीची चोरी झाली. ही बाब मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.
020621\40471341-img-20210602-wa0023.jpg
शहरातील विविध ठिकाणी सीसीटिव्ही केमेरे बसवण्याच्या मागणीचे निवेदन पालिका मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना देताना नगरसेवक प्रसाद आव्हाड,प्रशांत शेळके यांच्यासह कार्यकर्ते.