कुकडीचे आवर्तन दोन दिवसांनी वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:20 IST2021-03-10T04:20:54+5:302021-03-10T04:20:54+5:30
श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तन १० मार्चला बंद होणार आहे. श्रीगोंदा तालुक्यात काही चाऱ्यांवर टेलकडील शेतकऱ्यांना अद्याप पाणी मिळाले ...

कुकडीचे आवर्तन दोन दिवसांनी वाढवा
श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तन १० मार्चला बंद होणार आहे. श्रीगोंदा तालुक्यात काही चाऱ्यांवर टेलकडील शेतकऱ्यांना अद्याप पाणी मिळाले नाही. त्यामुळे कुकडीचे आवर्तन दोन दिवस वाढून मिळावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनःशाम शेलार यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे एका निवदेनाव्दारे केली आहे.
घनश्याम शेलार यांनी मुंबईत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची सोमवारी भेट घेऊन निवेदन दिले. यावर पाटील यांनी कुकडीचे आवर्तन दोन दिवस वाढविण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
घनश्याम शेलार पुढे म्हणाले, कुकडीच्या अधिकाऱ्यांनी पाणी वाटपाचे नियोजन केले आहे. पण, श्रीगोंदा तालुक्याला ९ दिवसांचा आवर्तन कालावधी मिळाला आहे. तो कालावधी १२ दिवसांचा मिळणे आवश्यक होते.
श्रीगोंद्यातील १३२ सह काही चाऱ्यांवरील दोन दिवसात पिकांचे भरणे होणार नाही. त्यामुळे आवर्तन कालावधीत दोन दिवसांची वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण जयंत पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावर सकारात्मक कार्यवाही होईल.