अंबिका महिला पतसंस्थेच्या ठेवीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:21 IST2021-03-16T04:21:03+5:302021-03-16T04:21:03+5:30
संस्थेची सन २०१९-२० या आर्थिक वर्षाची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा सभागृहात नुकतीच पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा नवले ...

अंबिका महिला पतसंस्थेच्या ठेवीत वाढ
संस्थेची सन २०१९-२० या आर्थिक वर्षाची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा सभागृहात नुकतीच पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा नवले या होत्या. सभेत वार्षिक अहवाल, नफाविभागणी, लेखापरीक्षक नेमणूक, अंदाजपत्रक या विषयांना कार्योत्तर मंजुरी देण्यात आली आहे. संस्थेला ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला आहे. आठ टक्के लाभांशवाटप करण्यात आले. थकबाकीत वाढ होत असल्याने वसुलीसाठी कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोनेतारण व गोदाम पावतीतारण यासारखे सुरक्षित कर्जवाटप वाढवावे, असे निश्चित करण्यात आले.
दैनिक ठेववाढीसाठी चांगले काम करणा-या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. कायदेशीर सल्लागार ॲड. पी.सी. बोर्डे यांनी मनोगत व्यक्त केले. व्यवस्थापक अण्णासाहेब जाधव यांनी प्रास्तविक केले. संचालिका अनिता माळी यांनी आभार मानले. (वा. प्र.)