वांबोरी टप्पा दोनमध्ये देवराई, त्रिभुवनवाडीचा समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST2021-06-29T04:15:55+5:302021-06-29T04:15:55+5:30

तिसगाव : वांबोरी चारी टप्पा दोनमध्ये पाथर्डी तालुक्यातील कौडगाव, देवराई, त्रिभुवनवाडी, निंबोडी, मांडवे गावांचा समावेश करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे ...

Include Devrai, Tribhuvanwadi in Wambori Phase II | वांबोरी टप्पा दोनमध्ये देवराई, त्रिभुवनवाडीचा समावेश करा

वांबोरी टप्पा दोनमध्ये देवराई, त्रिभुवनवाडीचा समावेश करा

तिसगाव : वांबोरी चारी टप्पा दोनमध्ये पाथर्डी तालुक्यातील कौडगाव, देवराई, त्रिभुवनवाडी, निंबोडी, मांडवे गावांचा समावेश करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे शिवसेनेचे तालुका संघटक राजेंद्र म्हस्के, क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष सतीश पालवे यांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली. सतत दुष्काळी परिस्थितीशी आमची गावे सामना करत आहेत. या गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. वांबोरी चारीसाठी आम्ही व आमच्या तीन पिढ्यांनी संघर्ष केला. चारीचे पाणी आमच्या गावांना आजही मिळू शकलेले नाही ही मोठी शोकांतिका असल्याचे सतीश पालवे यावेळी म्हणाले. त्यामुळे टप्पा दोनमध्ये तरी आमच्या गावांचा समावेश करून आम्हालाही पाण्याच्या माध्यमातून न्याय देण्यात यावा, अशी मागणी या गावच्या सरपंचांनी केली. यावेळी माजी सभापती संभाजी पालवे, शिवसेना नेते राजेंद्र म्हस्के, सरपंच राजेंद्र लवांडे, युवा नेते राजू पालवे उपस्थित होते.

Web Title: Include Devrai, Tribhuvanwadi in Wambori Phase II

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.