पोलिसांवरील हल्ल्याची घटना दुर्दैवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:20 IST2021-05-08T04:20:59+5:302021-05-08T04:20:59+5:30

गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला करत दगडफेक केल्याची घटना गुरुवारी (दि. ६) संगमनेर शहरातील दिल्ली नाका (तीन ...

The incident of attack on the police is unfortunate | पोलिसांवरील हल्ल्याची घटना दुर्दैवी

पोलिसांवरील हल्ल्याची घटना दुर्दैवी

गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला करत दगडफेक केल्याची घटना गुरुवारी (दि. ६) संगमनेर शहरातील दिल्ली नाका (तीन बत्ती) परिसरात घडली होती. या प्रकरणी सहा निष्पन्न आरोपींसह अज्ञात १० ते १५ जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांवर संगमनेरात झालेल्या हल्ल्याबाबत माध्यम प्रतिनिधींनी महसूलमंत्री थोरात यांच्यांशी संवाद साधला. सर्व प्रशासन यंत्रणा पोलिसांसह काम करते आहे. ते काम नागरिकांच्या हिताकरिता, त्यांच्या आरोग्याकरिता आहे, असेही थोरात म्हणाले.

---------

राधाकृष्ण विखे पाटील नैराश्यातून बोलतात

राधाकृष्ण विखे पाटील काय बोलतात याला फार महत्त्व देत जाऊ नका. शेवटी ते आता विरोधी पक्षाची भूमिका बजावत असताना नैराश्यातून बोलत असतात. जे इथे घडले तसे त्यांच्याकडे काही चुकीचे घडत नाही, असे नाही. शेवटी तो मानवी स्वभाव आहे. नैराश्यातून राधाकृष्ण विखे पाटलांचे बोलणे येत असते. त्यामुळे माध्यमांनी त्याला फार महत्त्व देऊ नये, असेही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. संगमनेरच्या लोकप्रतिनिधींचा त्यांच्या मतदारसंघात संपर्क राहिला नसल्याचे विखे बोलले होते. त्यावर महसूलमंत्री थोरात यांनी पलटवार केला.

Web Title: The incident of attack on the police is unfortunate