पूर्णवाद महोत्सवाचे वेदमंत्र जागराने उद्घाटन
By Admin | Updated: May 24, 2014 00:39 IST2014-05-23T23:55:08+5:302014-05-24T00:39:59+5:30
पारनेर : ६२ व्या पूर्णवाद महोत्सवाचे प. पू. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पारनेर येथे गुरुवारी मंगलमय वातावरणात उद्घाटन झाले.
पूर्णवाद महोत्सवाचे वेदमंत्र जागराने उद्घाटन
पारनेर : ६२ व्या पूर्णवाद महोत्सवाचे प. पू. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पारनेर येथे गुरुवारी मंगलमय वातावरणात उद्घाटन झाले. यावेळी गुरू-शिष्य मेळावा, दत्तमूर्तीस्थापनोत्सवास वेदमूर्तींनी केलेला मंत्रजागर सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला. २९ मे पर्यंत चालणार्या महोत्सवासाठी देशभरासह आॅस्ट्रेलिया,अमेरिका, मॉरिशस, कॅनडा या देशामधूनही पूर्णवादी शिष्य येथे दाखल झाले आहेत. पूर्णवाद प्रणेते डॉ. रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी ६२ वर्षांपूर्वी गुरू-शिष्य मेळाव्याच्या माध्यमातून परंपरा सुरू केली होती. त्यांचे चिरंजीव व पूर्णवाद वर्धिष्णू प. पू. विष्णू महाराज पारनेरकर यांनी पूर्णवाद महोत्सवाचे स्वरूप देऊन पूर्णवादाचा विचार संपूर्ण विश्वभरात पोहोचविला आहे. गुरूवारी रात्री पुणे येथील वेदमूती दंडगे गुरूजी व ब्रम्हवृंदांनी केलेल्या वेदमंत्रांच्या जागराने वातावरण मंगलमय झाले. वेदमंत्रोच्चारातच पूर्णवाद महोत्सवाचे उदघाटन झाले. यावेळी प. पू. विष्णू महाराज पारनेरकर, खासदार चंद्रकांत खैरे, पूर्णवाद महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष गुणेश पारनेरकर, कार्यवाह लक्ष्मीकांत पारनेरकर आदी उपस्थित होते.कार्याध्यक्ष गुणेश पारनेरकर यांनी पूर्णवाद महोत्सवाच्या माध्यमातून गुरू-शिष्य परंपरेला प्राधान्य देत, धर्म, भाषा, प्रांत यापुढे जाऊन एक परिवार आहोत, असे शिक्षण व कार्यक्रम या महोत्सवात दिले जातात. युवकांच्या संस्कृती व शिस्तीचे दर्शनही येथे घडते, असे सांगितले. खासदार चंद्रकांत खैरे यांनी पूर्णवाद तत्वज्ञानाच्या माध्यमातून पारनेरकर महाराजांनी मानवी जीवनाचे शास्त्र संपूर्ण जगाला सांगितले असून त्यांचे पूर्णवादी विचार माणूस जोडण्याचे काम करील, असा विश्वास व्यक्त केला. पूर्णवाद महोत्सवात शुक्रवारी सकाळी आळंदी येथील अशोकशास्त्री कुलकर्णी यांचे संस्कृतमधून व्याख्यान झाले. सायंकाळी पुणे येथील स्वरस्वतीताई यांचे प्रवचन झाले. तर रात्री प्रसिध्द गायिका पद्माताई तळवळकर यांची शास्त्रीय संगीत सभा रंगली. यावेळी संगीता पारनेरकर, शलाका पारनेरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)पूर्णवादी शिष्य परिवाराचा पूर्णवाद महोत्सव हा एक महत्वाचा उत्सव मानला जातो. त्यामुळे या उत्सवाला सर्व परिवारासहीत ते आवर्जून उपस्थित असतात. त्यामुळे देश, परदेशातूनही शिष्य पारनेरमध्ये दाखल झाल्याने पारनेर पूर्णवादमय बनले आहे.