नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे महाराष्ट्र दिनी उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:19 IST2021-03-07T04:19:14+5:302021-03-07T04:19:14+5:30

अहमदनगर : प्रशासकीयदृष्ट्या सर्वाधिक महत्त्वाच्या असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाची नवी इमारत पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनी ...

Inauguration of new Collector's Office on Maharashtra Day | नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे महाराष्ट्र दिनी उद्घाटन

नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे महाराष्ट्र दिनी उद्घाटन

अहमदनगर : प्रशासकीयदृष्ट्या सर्वाधिक महत्त्वाच्या असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाची नवी इमारत पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनी त्याचे सर्व काम पूर्ण होऊन उद्घाटन करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

मंत्री थोरात, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी शनिवारी औरंगाबाद रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जे.डी. कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पवार, नगरचे उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन आदी उपस्थित होते.

थोरात हे काँगेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या काळात महसूलमंत्री होते. त्यावेळी त्यांच्याच हस्ते या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर, राज्यात भाजपचे सरकार आले. आता महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यावेळी महसूलमंत्री असतानाच, थोरात यांनी इमारतीच्या बांधकामासाठी मंजुरी मिळून दिली होती, तसेच इमारतीच्या बांधकामाचीही सुरुवात झाली होती. सुरुवातीच्या टप्प्यात २८ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. दरम्यान, मधल्या काळात इमारतीचे बांधकाम थंडावले होते. ते काम आता जवळपास पूर्णत्वास गेले असून, इमारतीतील फर्निचर, तसेच इतर अनुषंगिक कामे होत आहेत. त्यासाठीचा आवश्यक निधीही उपलब्ध होऊन महाराष्ट्र दिनापर्यंत सर्व बाबींची पूर्तता होईल. नवीन अत्याधुनिक, देखणे असे जिल्हाधिकारी कार्यालय तयार होईल, असा विश्वास मंत्री थोरात यांनी व्यक्त केला.

यावेळी थोरात यांनी या नव्या इमारतीची पाहणी केली. प्रत्येक मजला त्यांनी पाहिला. कामाचे स्वरूप आणि दर्जा, प्रलंबित कामांसाठी लागणारा वेळ, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी आदींची माहिती त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.भोसले आणि अधीक्षक अभियंता कुलकर्णी यांच्याकडून घेतली. प्रलंबित कामे लवकरच पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

---------

फोटो- ०६ कलेक्टर ऑफिस

नगर-औरंगाबाद रोडवरील नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाची महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाहणी केली. समवेत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जी.डी. कुलकर्णी, संदीप निचिक, श्रीनिवास अर्जुन आदी.

Web Title: Inauguration of new Collector's Office on Maharashtra Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.