अंदुरे कॅन्सर क्लिनिकचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:44 IST2021-09-02T04:44:35+5:302021-09-02T04:44:35+5:30
अहमदनगर : पूर्णवेळ सेवा देणारे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट (केमोथेरेपी, टार्गेटेड थेरेपी, इम्युनोथेरेपी, कॅन्सर तज्ज्ञ) डॉ. दत्तात्रय अंदुरे आता नगरकरांच्या सेवेत ...

अंदुरे कॅन्सर क्लिनिकचे उद्घाटन
अहमदनगर : पूर्णवेळ सेवा देणारे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट (केमोथेरेपी, टार्गेटेड थेरेपी, इम्युनोथेरेपी, कॅन्सर तज्ज्ञ) डॉ. दत्तात्रय अंदुरे आता नगरकरांच्या सेवेत दाखल झाले आहे. सोमवारी अंदुरे कॅन्सर क्लिनिकचे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी साईदीप हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. एस. एस. दीपक, नरेंद फिरोदिया यांची उपस्थिती होती.
डॉ. दत्तात्रय अंदुरे हे अंदुरे कॅन्सर क्लिनिक, चौपाटी कारंजा, अहमदनगर येथे सुरू झाले आहे. या क्लिनिकच्या माध्यमातून डॉ. अंदुरे हे कॅन्सरच्या केमोथेरेपी, टार्गेटेड थेरेपी, इम्युनोथेरेपी या सुविधा देणार आहेत. डॉ. अंदुरे यांच्यामुळे आता कोणत्याही कर्करुग्णाला उपचाराकरिता पुणे किंवा मुंबईच्या दिशेने धाव घेण्याची गरज भासणार नाही, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आय. पी. डी सुविधा आणि गरजू रुग्णांना महात्मा फुले जीवनदायी योजनेंतर्गत साईदीप हॉस्पिटल येथे मोफत औषधोपचार मिळू शकणार आहेत. पद्मश्री पोपटराव पवार यांनीही डॉ. अंदुरे यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा गौरव केला.
कॅन्सर तज्ज्ञ म्हणून डॉ. अंदुरे यांनी आतापर्यंत नोबल हॉस्पिटल (पुणे), ऑन्को-लाईफ (सातारा, चिपळूण), प्रवरा मेडिकल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल (लोणी), सह्याद्री हॉस्पिटल (कऱ्हाड) येथे सेवा दिली आहे. दहा हजारांहून अधिक केमोथेरेपी, टार्गेटेड थेरेपी व इम्यून थेरेपी त्यांनी यशस्वीरीत्या केल्या आहेत. कॅन्सर औषधांच्या संशोधनाकरिता असणाऱ्या क्लिनिकल चाचणीत त्यांचा सक्रिय सहभाग आहे. स्तनाचा कर्करोग, पोटाचा व अन्ननलिकेचा कर्करोग, स्वादुपिंडाचा कर्करोग, मौखिक कर्करोग, स्त्रियांमधील गर्भाशय तसेच गर्भपिशवीच्या मुखाचा कर्करोग व ओव्हेरियन कर्करोग, टेस्टीक्युलर कर्करोग, रक्ताचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग, मूत्राशयाचा कर्करोग इत्यादी कर्करोगाचे उपचार करण्यात त्यांचे विशेष प्राविण्य आहे. (वा. प्र.)
--------
फोटो-३१ अंदुरे क्लिनिक
नगर येथील अंदुरे क्लिनिकचे उद्घाटन पोपटराव पवार, नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते झाले. समवेत डॉ. दत्तात्रय अंदुरे, पुष्पा अंदुरे.
फोटो कैप्शन- अंदुरे कॅन्सर क्लिनिकच्या उद्घाटन प्रसंगी पद्मश्री पोपटराव पवार, डॉ. एस.एस. दीपक, नरेंद्र फिरोदिया, पुष्पाताई अंदुरे, डॉ. दत्तात्रय अंदुरे आणि इतर.