पाथर्डीत मराठा आरक्षणासाठी बेमुदत ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 13:22 IST2018-07-27T13:22:24+5:302018-07-27T13:22:36+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पाथर्डी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातून मोर्चा काढून शहर बंद ठेवण्यात आले.

पाथर्डीत मराठा आरक्षणासाठी बेमुदत ठिय्या आंदोलन
पाथर्डी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पाथर्डी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातून मोर्चा काढून शहर बंद ठेवण्यात आले. काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहून आंदोलनाला सुरवात करण्यात आली.
कसबा उपनगरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मराठा क्रांती मोचार्ला सुरवात करण्यात आली. मोर्चात तालुक्यातून आलेल्या हजारो युवकांनी हातात भगवे झेंडे घेवून मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने फडणवीस सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या. मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यानंतर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शहरातील मुख्य पेठातून मोर्चा वसंतराव नाईक चौकातील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यासमोर आल्यानंतर मोचार्चे रूपांतरण सभेत झाले. याठिकाणी मयत काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहून प्रमुख कार्यकर्त्यासह मुस्लीम, मागासवर्गीय समाजातील नागरिकांनी मराठा आरक्षणाला पाठींबा देण्यासाठी विचार व्यक्त केले.
यावेळी मोर्चेकरयाना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले. यापुढील कालावधीत साखळी पद्धतीने वसंतराव नाइक चौकात आरक्षण मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरु राहणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळा महाविद्यालयास सुट्टी देण्यात आली आहे. तर शहर बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. मुख्य महामार्गावर आंदोलन सुरु असल्याने वाहतुकीस अडथळा येऊ नये म्हणून शेवगाव रोडने वाहतूक वळवण्यात आली आहे.