नागलवाडी घाटातील रस्ता कामात सुधारणा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:27 IST2021-06-09T04:27:08+5:302021-06-09T04:27:08+5:30
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता हनुमंत सानप यांना काकडे यांनी निवेदन दिले. यावेळी जनशक्तीचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे, ...

नागलवाडी घाटातील रस्ता कामात सुधारणा करा
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता हनुमंत सानप यांना काकडे यांनी निवेदन दिले. यावेळी जनशक्तीचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे, उपाध्यक्ष संजय आंधळे, राजूभाऊ पोटफोडे, नागलवाडीचे सरपंच ॲड. किरण जाधव, ग्रा.पं. सदस्य संदीप गीते, गोरख खेडकर, किसनराव राठोड, नवनाथ फुंदे, नवनाथ खेडकर, राम गीते, बप्पासाहेब बर्डे, ॲड. बाळासाहेब शिंदे, दुर्गाजी रसाळ, सुनील आव्हाड, अमोल निकम उपस्थित होते.
बोधेगाव ते भगवानगड या रस्त्याचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. परंतु हे काम अगदी धीम्या गतीने सुरू असल्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. पावसाळा सुरू झाल्याने येथील डोंगर उतारावरील धबधबे वाहू लागल्यास पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी येथे यात्रा भरते. त्यामुळे रस्त्याचे काम लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. तसेच गोळेगाव ते नागलवाडी दरम्यानचा रस्ता हा घाट वळणाचा असून, काही ठिकाणी फारच अरुंद आहे. रस्त्याच्या बाजूला खोल दरी व लगतच गोळेगाव पाझर तलाव आहे. त्यामुळे वाहनांच्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्यावर खड्डे पडू नये म्हणून घाटपरिसरात आरसीसी गटार (ड्रेन) बांधावी, असे काकडे यांनी निवेदनात म्हटले आहे.