शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींवर शासकीय व्यक्ती नेमणे अशक्य; ग्रामविकासमंत्री ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 01:45 IST

न्यायालयालाही म्हणणे पटवून देऊ

अहमदनगर : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सर्व शासकीय अधिकारी-कर्मचारी सध्या कोरोना उपाययोजनांत गुंतले आहेत. अशात ग्रामपंचायतींवर शासकीय व्यक्ती नेमणे शक्य नाही. ही बाब न्यायालयाच्याही निदर्शनास आणून देऊ, असे सांगत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे ‘पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने प्रशासक नेमावा’ या मुद्द्यावर ठाम राहिले. मुश्रीफ यांनी शुक्रवारी नगरमध्ये कोरोना आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर शासकीय कर्मचारीच प्रशासक म्हणून नेमा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. तर नागपूर खंडपीठाने प्रशासक नेमण्याचा राज्य सरकारचा निर्णय अवैध ठरवला आहे. त्यावर मुश्रीफ म्हणाले, सध्या कोरोनामुळे कोणत्याही निवडणुका घेणे शक्य नाही. राज्यात तब्बल १४ हजार ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमायचा आहे. एवढे शासकीय अधिकारी आपल्याकडे आहेत का? जे आहेत ते कोरोना उपाययोजनांत गुंतलेले आहेत. त्यांना हटवले तर कोरोनाची स्थिती आणखी बिकट होईल.बाहेरून आलेल्या प्रशासकाला तेथे काम करण्यास मर्यादा येतील. त्यामुळे प्रशासक हा गावातीलच व्यक्ती हवा, असे सरकारचे म्हणणे आहे. ते न्यायालयालाही पटवून दिले जाईल, असे मुश्रीफ म्हणाले.

मी राम मंदिर बांधले आहे, पाहायला या!

शरद पवारांच्या राम मंदिरावरील विधानावर मुश्रीफ यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, राम मंदिराला कोणाचाही विरोध नाही. एखाद्या मंदिराची प्रतिष्ठापना करायची असेल तर वातावरण मंगलमय हवे. परंतु सध्या देशभर कोरोनाची चिंता आहे, एवढाच पवारांच्या विधानाचा अर्थ होता, असे म्हणत मुश्रीफ यांनी पवारांचे समर्थन केले. माझा जन्म रामनवमीचा आहे. मी माझ्या मतदारसंघात कागल येथे भव्य रामाचे मंदिर बांधले आहे, ते पाहायला या, असे सांगत त्यांनी राम मंदिरावरून राजकारण करणाऱ्यांना टोला मारला.

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफSharad Pawarशरद पवार