खर्डा शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:38 IST2021-03-04T04:38:58+5:302021-03-04T04:38:58+5:30
खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथे आमदार रोहितदादा पवार मंचच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात आला. बारामती ॲग्रोच्या विश्वस्त सुनंदा ...

खर्डा शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात
खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथे आमदार रोहितदादा पवार मंचच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात आला.
बारामती ॲग्रोच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या संकल्पनेतून आमदार रोहितदादा पवार विचार मंचची स्थापना नुकतीच करण्यात आली. मंचाचे अध्यक्ष दत्तराज पवार यांनी यामध्ये पुढाकार घेऊन स्वच्छतेविषयी जनजागृती केली. सहकाऱ्यांसोबत त्यांनी खर्डा शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा संकल्प केला. तसेच आठवड्यातून दोन दिवस प्रत्येक गल्लीत हे स्वच्छता अभियान राबविताना शहरातील सीतारामगड, देवीचे मंदिर, श्रद्धा गणेश मंदिर परिसर, मयूरेश्वर गणेश मंदिरचा परिसर स्वच्छ करण्यात आला. ग्रामस्थही या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते. माजी ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब ढगे, विकास शिंदे, ग्रामपंचायत सदस्या सुनीता जावळे, महालिंग कोरे, भीमराव घोडेराव, गुरुराज पवार, दीपक जावळे, अवी सुरवसे, नीता पवार आदींनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.