बँक, पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांचे तत्काळ लसीकरण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:10 IST2021-05-04T04:10:32+5:302021-05-04T04:10:32+5:30

राज्यात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याकरिता राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. ...

Immediate vaccination of bank and credit union employees | बँक, पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांचे तत्काळ लसीकरण करावे

बँक, पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांचे तत्काळ लसीकरण करावे

राज्यात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याकरिता राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. राज्य शासनाच्या १३ एप्रिलच्या ब्रेक द चेन या आदेशान्वये सर्व शासकीय कार्यालय, सर्व राष्ट्रीयीकृत, सहकारी, खासगी बँका व पतसंस्था यांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करून ते सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राष्ट्रीयकृत, सहकारी, खासगी बँका व पतसंस्था या नागरिकांच्या आर्थिक बाबींशी निगडित असल्याने या मधील कर्मचाऱ्यांचा शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे जनतेशी संपर्क असतो. सध्या सर्व बँक व पतसंस्थेचे कर्मचारी फ्रन्टलाइन कर्मचारी म्हणून सेवा देत आहे. अनेक बँक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर काहींचा यामध्ये जीवदेखील गेला आहे. त्यामुळे तत्काळ लसीकरण करणे अत्यावश्यक आहे. बँकेत अपुरे कर्मचारी असल्याने बँकेवर ताण वाढला आहे. लसीकरणासाठी रांगेत उभे राहून मोठ्या प्रमाणात वेळ जात असल्याने काम सोडून कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी जाता येत नाही. नागरिकांची आर्थिक अडचण निर्माण होऊ नये व बँक सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सुरू राहण्यासाठी सर्व राष्ट्रीयकृत, सहकारी, खासगी बँका व पतसंस्थेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

बँक कर्मचारी फ्रन्टलाइन कर्मचारी म्हणून नागरिकांना सेवा देत आहे. त्यांचे लसीकरण करण्यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. त्यांना विशिष्ट वेळ देऊन कमी वेळेत लसीकरण करून देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून आयुक्तांशी चर्चा करून उपाययोजना केल्या जाणार असल्याचे आश्‍वासन यावेळी उपायुक्त डॉ.प्रदीप पठारे यांनी शिष्टमंडळास दिले.

---------------------

ओळी- बँका व पतसंस्थेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांचे कोरोना लसीकरण होण्यासाठी सहकार्य करण्याच्या मागणीचे निवेदन शिवसेना, जिल्हा अग्रणी बँक व सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने मनपा उपायुक्त डॉ.प्रदीप पठारे यांना देताना शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख आनंद लहामगे, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थाक संदीप वालवकर, सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक अभिनव कुमार.

फोटो -०३ आनंद लहामगे

Web Title: Immediate vaccination of bank and credit union employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.