शेतीसह व्यावसायिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:45 IST2021-09-02T04:45:50+5:302021-09-02T04:45:50+5:30

शिवाजी कर्डिले : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर: औरंगाबाद रोडवरील जेऊर बायजाबाई परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह गावातील ...

Immediate inquiries into the losses of traders, including agriculture | शेतीसह व्यावसायिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा

शेतीसह व्यावसायिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा

शिवाजी कर्डिले : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर: औरंगाबाद रोडवरील जेऊर बायजाबाई परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह गावातील व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून संबंधित भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी निवेदनाद्वारे सोमवारी केली.

भाजपाचे माजी आमदार कर्डिले यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन निवेदनात म्हटले आहे की, सीना आणि खारोळी नदीला पूर आला होता. या पुराचे पाणी जेऊर बाईजाबाई मधील दुकानात घुसले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आधीच कोरोनाच्या काळात व्यावसायिक मोठ्या अडचणीत असताना नैसर्गिक आपत्ती ओढवल्याने आर्थिक अडचणीत सापडला आहे. जिल्हा प्रशासनाने तत्काळ नुकसानीचे पंचनामे करून अर्थसहाय्य करावे. तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली उभे पिके पावसाच्या पाण्याने वाहून गेली आहेत. शेतातील नुकसानीचे पंचनामे करून शासनाच्या वतीने आर्थिक मदत करावी. पुराच्या पाण्यामुळे धनगरवाडी, चापेवाडी, ससेवाडी, तोडमलवाडी, शेटे वस्ती या ठिकाणचा संपर्क तुटला. धनगरवाडी आणि परिसरातील कांदे, मूग, बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

.....

Web Title: Immediate inquiries into the losses of traders, including agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.