प्रवासी रिक्षातून अवैधरित्या वाळू वाहतूक
By शेखर पानसरे | Updated: June 27, 2024 14:27 IST2024-06-27T14:26:34+5:302024-06-27T14:27:02+5:30
पोलिस हेड कॉन्स्टेबल टोपे अधिक तपास करीत आहेत.

प्रवासी रिक्षातून अवैधरित्या वाळू वाहतूक
शेखर पानसरे, लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर : विना क्रमाकांच्या प्रवासी रिक्षातून अवैधरित्या वाळू वाहतूक सुरू होती. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करत संबंधिताविरुद्ध संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.२७) सकाळी ७ वाजेच्या सुमारास शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सटूआई मंदिराजवळ करण्यात आली.
नवनाथ सुखदेव चव्हाण (वय ३७, रा. शीतलामाता मंदिराजवळ, संगमनेर खुर्द, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबल हरिश्चंद्र यशवंत बांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. प्रवरा-म्हाळुंगी नदीच्या परिसरातून प्रवासी रिक्षातून अवैधरित्या वाळू वाहिली जात असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांना मिळाली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. पोलिस हेड कॉन्स्टेबल टोपे अधिक तपास करीत आहेत.