अवैध वाळू वाहतूक : नेवासा येथे दोन टेम्पोसह सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 20:10 IST2019-06-20T20:10:31+5:302019-06-20T20:10:36+5:30
तालुक्यातील भालगाव येथील गोदावरी नदी पत्रात व मडकी येथील प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी दोन टेम्पो नेवासा पोलिसांनी पकडला.

अवैध वाळू वाहतूक : नेवासा येथे दोन टेम्पोसह सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत
नेवासा : तालुक्यातील भालगाव येथील गोदावरी नदी पत्रात व मडकी येथील प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी दोन टेम्पो नेवासा पोलिसांनी पकडला. यामध्ये दोन ब्रास वाळुसह सात लाख पंधरा हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बुधवारी रात्री १० च्या सुमारास देवगड ते नेवासा रस्त्यावर मडकी शिवारात प्रवरा नदीपात्रातुन अवैधरित्या वाळूची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना समजली. यावेळी त्यांच्या पथकातील कैलास साळवे, वसीम इनामदार, प्रीतम मोढवे, महेश कचे यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने सापळा रचला. त्यावेळी टेम्पो (क्र.एम.एच.२१ -५५४८) पकडला. त्यात अंदाजे एक ब्रास वाळू होती. यामध्ये तीन लाख सात हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संजय नळघे याला ताब्यात घेण्यात आले आहे. तर गुरुवारी सकाळी भालगाव येथील गोदावरी नदीपात्रात वाळू वाहतुकीची माहिती पोलीस पथकातील बबन तमनर, महेश कचे, गणेश गलधर, केवळ राजपूत यांनी सापळा रचून टेम्पो (क्र. एम.एच.०४, डी.के.८३२४)पकडला. यामध्ये चालक गणेश शिरसाठ ला ताब्यात घेण्यात आले असून चार लाख सात हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल संदीप मस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविला आहे.