अवैधरित्या वाळू वाहतुकीतील डंपर, जेसीबी जप्त
By | Updated: December 5, 2020 04:35 IST2020-12-05T04:35:10+5:302020-12-05T04:35:10+5:30
तहसीलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक शोध पथकातील तलाठी योगिता ...

अवैधरित्या वाळू वाहतुकीतील डंपर, जेसीबी जप्त
तहसीलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक शोध पथकातील तलाठी योगिता शिंदे, तलाठी संग्राम देशमुख व तलाठी संजय शितोळे हे गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना खांडगाव शिवारातील कालिकामाता मंदिरापासून प्रवरा नदीपात्राकडे जाणाऱ्या रस्त्याहून अवैधरित्या वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. हे पथक कारवाईसाठी जात असताना त्यांना एका शेतात डंपर व जेसीबी सुरू असल्याचे दिसले. पथकाने तेथे जावून पाहिले असता त्यांना डंपरमध्ये वाळू तसेच वाळू उपशासाठी वापरण्यात आलेला जेसीबी व मोठ्या प्रमाणात वाळूसाठा आढळून आला. या पथकाने वाळूने भरलेला डंपर, जेसीबी ताब्यात घेतला. डंपरमधील ४ ब्रास व साठविलेली १५ ब्रास अशी एकूण १९ ब्रास वाळू कारवाईदरम्यान जप्त करण्यात आली. पंचनाम्यानंतर पुढील कारवाईसाठी तहसीलदार निकम यांच्याकडे अहवाल सादर केल्याचे तलाठी शिंदे यांनी सांगितले.
-----------
फोटो नेम : ०२ वाळू वाहतूक , संगमनेर
ओळ : संगमनेर तहसील कार्यालयातील अधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक शोधपथकाने अवैधरित्या वाळू वाहतूक होत असलेला डंपर व वाळू उपशासाठी वापरण्यात आलेला जेसीबी कारवाईदरम्यान जप्त केला.