घोसपुरीत खानावळीच्या नावाखाली अवैध दारूविक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:00 IST2021-02-20T05:00:25+5:302021-02-20T05:00:25+5:30

केडगाव : खानावळीच्या नावाखाली गावाच्या परिसरात सुरू असलेल्या अवैध दारूविक्री दुकानांविरोधात घोसपुरी (ता. नगर) येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत ...

Illegal sale of liquor under the name of Ghoshpuri restaurant | घोसपुरीत खानावळीच्या नावाखाली अवैध दारूविक्री

घोसपुरीत खानावळीच्या नावाखाली अवैध दारूविक्री

केडगाव : खानावळीच्या नावाखाली गावाच्या परिसरात सुरू असलेल्या अवैध दारूविक्री दुकानांविरोधात घोसपुरी (ता. नगर) येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत ही दुकाने बंद पाडली. तसेच पुन्हा ही दुकाने सुरू झाल्यास ग्रामस्थ थेट कायदा हातात घेऊन दुकाने जेसीबी लावून पाडतील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

नगर तालुक्यातील सारोळा कासार-घोसपुरी रस्त्यावर घोसपुरी गावाच्या शिवारात खानावळीच्या नावाखाली अवैध दारूविक्रीची दोन दुकाने थाटलेली आहेत. तेथे खुलेआम मोठ्या प्रमाणात दारूविक्री होत असल्याने गावातील सामाजिक शांतता भंग पावत असल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट दारू दुकानांमध्ये जात दुकानचालकांना ही दुकाने तातडीने बंद करण्यास सांगितले. दुकाने सुरु ठेवली तर गावातील महिला व ग्रामस्थ आक्रमक होऊन कायदा हातात घेतील, असा इशाराही दिला.

यावेळी सरपंच किरण साळवे, उपसरपंच विठ्ठल हंडोरे, माजी उपसरपंच प्रभाकर घोडके, प्रा. अशोक झरेकर, राजेंद्र लांडगे, बाळासाहेब झरेकर, श्याम शेख, संजय खोबरे, बापू झरेकर, अनिल हंडोरे, किसन पारधे, बबन झरेकर, सुभाष ठोकळ, सोमनाथ झरेकर, पद्माकर झरेकर, संजय झरेकर, सारोळा कासारचे माजी उपसरपंच दत्तात्रय कडूस, सोसायटीचे संचालक दत्ता लिंभोरे यांच्यासह दोन्ही गावांमधील ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर नगरला येऊन याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांनाही ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे.

फोटो ओळी१९ घोसपुरी

घोसपुरी शिवारात खानावळीच्या नावाखाली सुरू असलेली अवैध दारूविक्रीची दुकाने बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी दुकानचालकांना बजावले.

Web Title: Illegal sale of liquor under the name of Ghoshpuri restaurant