बेकायदा गौण खनिज उत्खनन
By Admin | Updated: November 28, 2014 01:14 IST2014-11-28T00:43:45+5:302014-11-28T01:14:57+5:30
श्रीगोंदा : कोसेगव्हाण शिवारात २ हजार ६४७ ब्रॉस मुरुमाचे बेकायदा उत्खनन केल्याप्रकरणी पुणे येथील लाईनटर श्रीराम मॅन्युफॅक्चरींग या कंपनीवर तहसीलदार डॉ़ विनोद भामरे यांनी कारवाई

बेकायदा गौण खनिज उत्खनन
श्रीगोंदा : कोसेगव्हाण शिवारात २ हजार ६४७ ब्रॉस मुरुमाचे बेकायदा उत्खनन केल्याप्रकरणी पुणे येथील लाईनटर श्रीराम मॅन्युफॅक्चरींग या कंपनीवर तहसीलदार डॉ़ विनोद भामरे यांनी कारवाईचा बडगा उगारला असून, बेकायदा उत्खनन केल्याप्रकरणी कंपनीला ८४ लाख ७० हजार ४२५ रुपये दंड ठोठावला आहे़ दंडाची रक्कम ७ दिवसात भरावी अन्यथा कंपनीच्या सात बारा उताऱ्यावर बोजा चढविला जाईल, अशी नोटीस कंपनीला बजावण्यात आली आहे़
कोसेगव्हाण शिवारात पवन ऊर्जा प्रकल्पासाठी लाईनटर श्रीराम कंपनीने २ लाख ६४७ ब्रॉस मुरूमाचे बेकायदा उत्खनन केले. तत्कालीन तहसीलदार अनिल दौंडे यांनी ९ जून २०१३ रोजी या कंपनीला ८४ लाखांचा दंड केला होता. तसेच कोसेगव्हाणचे कामगार तलाठी संतोष तनपुरे यांनी १३ सप्टेबर २०१३ रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात लाईनटर कंपनीच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती़ लाईनटर श्रीराम फॅन्युफॅक्चरींग कंपनीने तहसीलदारांनी केलेल्या दंडाकडे दुर्लक्ष करीत आपले काम चालू ठेवले आणि दंडाची रकमेतील एक दमडीही भरली नाही. तहसीलदार डॉ.विनोद भामरे यांनी लाईनटर कंपनीला ८४ लाखांचा दंड सात दिवसात भरण्याची नोटीस दिली आहे. यावर मे. लाईनटर कंपनीचे अधिकारी काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.
(तालुका प्रतिनिधी)